Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
Video/ओटीटीच्या प्रसारावर नियंत्रण हवे, सरसंघचालकांची भूमिका 
16-Oct-2021, 12:48:07 pm
Edited by - Pravin wankhede
चांगल्या घटनेबरोबर वाईट घटना घडते अशा वेळेसही प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर जोडणारी भाषा बोलावी. मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.  
Abhijeet Bharat

नागपूर : देशात चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या घटना घडतात. परंतु, समाजात तोडणारी नव्हे तर जोडणारी भाषा बोलल्या जावी अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. नागपूर रेशीमबाग येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक बोलत होते.    

भारतीयांना त्याग आणि बलिदानामुळेच स्वातंत्र्य मिळाले. इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये. आजही अनेक मुद्द्यांवरून भेदभाव होतोय.  दोन राज्यांमध्ये गोळीबार केला जातोय. त्यामुळे देशाची अखंडता हरवत चालली आहे. त्यासाठी इतिहासाचे वाचन गरजेचे असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले.  

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण video 

कोरोनाकाळात मुलांकडे मोबाईल आलेत. शाळकरी मुलं ओटीटीच्या आहारी गेले. पण ओटीटी माध्यमांवर काय दाखवले जाते याचे कोणाकडेही नियंत्रण नाही. या माध्यमांचा वापर कशासाठी केला जातोय हे बघण्याची गरज आहे. मुलांवर वाईट परिणाम होत असल्याचे यावेळी सरसंघचालक म्हणाले. देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी पडतात. त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढतेय, नवीन तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर केला जातोय. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणायला हवे असे डॉ. भागवत म्हणाले. 

मातृभाषेचा वापर व्हावा, स्वभाषा, स्वभूषा आणि इतरही गोष्टींचे जाणिवपूर्वक आचरण व्हावे. भारतीयांना 'स्व'चा विसर पडता कामा नये असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, देशाच्या सीमावर्ती जिल्ह्यातील मुस्लिम लोकसंख्या वाढणे आणि तिथल्या मुस्लिम जनसंख्येची सरासरी ही देशाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. हे बांगलादेशमधून घुसखोरी होत असल्याचे दर्शवते. आपल्या देशात पुन्हा एकदा लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा.  

Abhijeet Bharat

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.