Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी, खाद्यतेलाच्या किमतीत होणार घट
15-Oct-2021, 12:30:23 pm
Edited by - Pravin wankhede
दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अशात आता केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अशात आता केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. कच्च्या पाम तेलावरील शुल्क कपात करण्यात आल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत प्रतिकिलो १५ रुपयांनी घट झाली आहे. सणासुदीच्या काळात केंद्राने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यातच दिवाळी जवळ आल्याने अनेकांना चिंता लागून राहिली आहे. सण-उत्सव कसा साजरा करायचा हा मोठा प्रश्न लोकांना पडला आहे. हे पाहता केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने पाम आणि सूर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे. यापूर्वी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने तेल आणि तेलबियांवर स्टॉक र्मयादा लादण्याचा आदेश जारी केला होता. साठा र्मयादा ३१ मार्च २0२२ पयर्ंत लागू राहील.

राज्यांना आदेश जारी करण्यास आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, कच्च्या पाम तेलावरील शुल्क कपात ८.२५ टक्के (आधी २४.७५ टक्के), आरबीडी पामोलिन १९.२५ टक्के (आधी ३५.७५ टक्के), आरबीडी पाम तेलावर १९.२५ टक्के (आधी ३५.७५ टक्के) करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर खाद्य तेलात १५ रुपयांची कपात होऊ शकते.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) अधिसूचनेत म्हटले आहे की, १४ ऑक्टोबरपासून शुल्कात कपात लागू झाली असून आणि ३१ मार्च २0२२ पयर्ंत लागू राहील.
गेल्या महिन्यात ११ सप्टेंबर रोजी पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले होते. तर कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क १0 टक्क्य़ावरून २.५ टक्के करण्यात आले.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.