Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीवर निळ्या पाखरांचे अभिवादन
16-Oct-2021, 12:43:47 pm
Edited by - Pravin wankhede
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. अनुयायांना धम्माचा मार्ग दाखवला.
Abhijeet Bharat

नागपूर: कोरोना संकटामुळे दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार नसला तरी, नागपुरात विविध ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रॅगन पॅलेस, बेझनबागसह नागपुरात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कार्यक्रमांद्वारे धम्मचक्र प्रवर्तनाचा जागर होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. अनुयायांना धम्माचा मार्ग दाखवला. तेव्हा पासून बौद्ध अनुयायी १४ ऑक्टोबर व विजयादशमीच्या दिवशी 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' उत्साहात साजरा करतात. काल १४ ऑक्टोबर रोजी अनुयायांनी दीक्षाभूमीला अभिवादन केला.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी चा परिसर सजविण्यात आला आहे. ठिकठिकाणी पंचशील ध्वज आणि रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी भिक्खू संघ व स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. विजयादशमीला सकाळी ९ वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेऊन बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. तर ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दोन दिवसांचा धम्मचक्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ड्रॅगन पॅलेस विविध रोषणाईने सजवण्यात आले आहे.  

Abhijeet Bharat

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.