Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात, निर्देशांक ६१ हजारावर
14-Oct-2021, 12:39:21 pm
Edited by - Pravin wankhede
मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) निर्देशांक (सेन्सेक्स) गुरुवारी पहिल्यांदाच 61 हजाराच्या वर ओपन झाला आहे.
Abhijeet Bharat

मुंबई: भारतीय शेअर बाजारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) निर्देशांक (सेन्सेक्स) गुरुवारी पहिल्यांदाच 61 हजाराच्या वर ओपन झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी 61 हजार 88 ने सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच निर्देशांकाने 422 अंकानी उसळी घेत 61 हजार 159 वर निर्देशांक पोहोचला. हा निर्देशांक पहिल्यांदा 61 हजाराच्या पार गेल्यानं मुंबई शेअर बाजाराने नवा विक्रम केला आहे.

बुधवार देखील ठरला टॉप -बुधवारी बीएसईचा निर्देशांक 335 अंकांची उसळी घेऊन 60 हजार 628 वर सुरू झाला होता. तो 60 हजार 836 वर बंद झाला. त्यामुळे गुरुवारी निर्देशांक 61 हजाराचा पल्ला गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानुसार आज 61 हजार 159 अंकांनी सेन्सेक्स सुरू झाला.निफ्टी देखील जोरात -त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा निर्देशांक निफ्टी-50 देखील वधारला आहे. निफ्टीने 18 हजार अंकाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये टाटा मोटर्सचे शेअर जवळपास 21 टक्क्यांनी वाढले. आज निफ्टी 106 अंकांनी उसळी घेत 18 हजार 097.85 वर सुरू झाला.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.