Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
CSK vs KKR रंगणार IPL २०२१ चा अंतिम सामना
14-Oct-2021, 12:30:59 pm
Edited by - Pravin wankhede
कोलकाचा नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाचा नाईट रायडर्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Abhijeet Bharat

दुबई: कोलकाचा नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाचा नाईट रायडर्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता 15 ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाताचा संघ सामना खेळल्या जाणार आहे. 

मागील वर्षीच्या हंगामात अंतिम फेरीपर्यंत धडक दिलेल्या दिल्ली संघाचे आयपीएल स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न कोलकाताच्या विजयामुळे पुन्हा भंगले आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नईची अंतिम सामन्यातील लढत शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. कोलाकाताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत दिल्लीच्या संघाला १३५ धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या सलामीवीरांनी धडाकेबाज फटकेबाजी करीत संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. ४१ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५५ धावा काढणारा कोलकाताचा व्यंकटेश अय्यर सामनावीर ठरला कोलकाताच्या संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये अप्रतिम कामगिरी करीत दिल्लीचे आव्हान संपुष्टात आणले. दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी  संघाला दणकेबाज सुरुवात करून दिली. अय्यर आणि गिल या युवा सलीमीवीरांच्या जोडीने ९६ धावांची भागीदारी रचली. गिलनेही अय्यरला चांगली साथ दिली आणि त्यामुळे कोलकाताच्या संघाला या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब करता आले. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा कोलकाताचा कर्णधार मॉर्गनने घेतलेला निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे  दाखवून दिले.

दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजांवर केकेआरच्या गोलंदाजांनी अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. मागील सामन्यातपृथ्वी शॉ चमकला होता. पण, यावेळी त्याला १८ धावाच करता आल्या. वरुण चक्रवर्तीने पृथ्वीला बाद करीत दिल्लीला मोठा धक्का दिला. शिखर धवनला सर्वाधिक ३६ धावा काढता आल्या. कर्णधार ऋषभ पंत, शेमरन हेटमायरसारखे आक्रमक फलंदाज अपयशी ठरले आणि त्याचा मोठा फटका दिल्लीच्या संघाला बसला. श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावांची खेळी साकारली. पण, त्यामध्येही जास्त आक्रमकता पाहायला मिळाली नाही. शेवटच्या षटकात फिरकीपटू आर. अश्विनने दोन फलंदाजांना बाद करून दिल्लीच्या आशा पल्लवित केल्या होत्या. दोन चेंडूंत सहा धावांची गरज असताना कोलकाताच्या राहुल त्रिपाठीने षटकार खेचून संघाला एक चेंडू राखून विजय मिळवून दिला. 

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.