Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
एकतर्फी प्रेमातून १४ वर्षीय मुलीची हत्या: २२ वर्षीय तरुणाला अटक
13-Oct-2021, 1:13:36 pm
Edited by - Pravin wankhede
Abhijeet Bharat

पुणे: एकतर्फी प्रेमातून एका १४ वर्षीय कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने सपासप वार करीत तिची हत्या करण्यात आली. या घटनेत मुलीचा जागेवरच मृत्यू झाला असून, हा हल्ला आरोपीने एकतर्फी प्रेमातून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. क्षितीजा अनंत व्यवहारे असं या मुलीचं नाव असून, आरोपीचं नाव शुभम भागवत असं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी माध्यम प्रतिनिधीना दिलेल्या माहितीनुसार, क्षितिजा अनंत व्यवहारे ही मुलगी सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावा करीता आली होती. तेव्हा त्या मुलीच्या नात्यातील हृषिकेश ऊर्फ शुभम भागवत हा त्याच्या मित्रा सोबत दुचाकीवरून आला. काही समजण्याच्या आत क्षितिजावर कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केले. यानंतर आरोपीने क्षितीजासोबत असलेल्या मैत्रिणींना धमकावून पळवून लावलं. यानंतर आरोपीही घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. क्षितीजाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांना घटनास्थळी एक पिस्तूल आढळून आलं असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

माणुसकीला काळीमा फासणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे.

शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पुण्याचे पालकमंत्री तथा राज्य कबड्डी संघटना तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाहीत. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.