Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
'ई-कचरा' व्यवस्थापनावर जनजागृती  
13-Oct-2021, 12:25:54 pm
Edited by - Pravin wankhede
नागपूरच्या सेमीनरी हिल्स स्थित केंद्र शासनाच्या  केंद्रीय लोकनिर्माण विभाग- सीपीडब्ल्यूडी रहिवासी कॉलनी परिसरात नुकतेच  'ई-कचरा' व्यवस्थापन या विषयावर एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Abhijeet Bharat

नागपूर: नागपूरच्या सेमीनरी हिल्स स्थित केंद्र शासनाच्या  केंद्रीय लोकनिर्माण विभाग - सीपीडब्ल्यूडी रहिवासी कॉलनी परिसरात नुकतेच  'ई-कचरा' व्यवस्थापन या विषयावर एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सीपीडब्ल्यूडी कॉलनी टाईप 5 मधील रहिवाशांना रितू अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या जनजागृती चर्चेद्वारे कचरा व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात आली. आपल्या घरांमध्ये आणि उद्योग- आस्थापनामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरल्यानंतर फेकून दिल्या जातात त्याला इलेक्ट्रॉनिक कचरा ई-कचरा म्हणतात.

जेव्हा हा कचरा योग्यरित्या गोळा केला जात नाही तेव्हा रोग्य आणि पर्यावरणासाठी समस्या उद्भवतात, अशी माहिती  पर्यावरण अ‍भ्यासक शेफाली दुधबडे यांनी यावेळी दिली. प्लास्टिक आणि काचेच्या व्यतिरिक्त, ई-कचऱ्यामध्ये कॅडमियम, शिसे, पारा यासारख्या धोकादायक रसायनांचे मिश्रण असते. ही हानिकारक रसायने  जमिनीत प्रवेश करतात आणि जलाशयांना दूषित करतात. ई-कचरा जळल्यावर विषारी वायू हवेत सोडतात आणि वायू प्रदूषण वाढवते. यासाठी  सुरीटेक्सचे वैभव सूरी यांनी ई-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी यावर विस्तृत मार्गदर्शन केले.   या कार्यक्रमाच आभार प्रदर्शन अन्वितीच्या पूनम  मिश्रा यांनी केले. यावेळी सीपीडब्लूडी कॉलनीचे रहिवासी तसेच इनर व्हील क्लब नागपूर पूर्वच्या अध्यक्ष डॉ उज्ज्वला मोहता आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.