Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
 Facebook, Insta, WhatsAPP पाठोपाठ Gmail ही डाऊन
12-Oct-2021, 8:07:39 pm
Edited by - Pravin wankhede
काही दिवसांपूर्वी गुगलच्या लोकप्रिय Facebook, Insta, WhatsAPP सेवा तात्पुरत्या बंद झाल्या होत्या. पाठोपाठ आता Gmail सेवाही आज डाऊन झाल्याचे समोर आले आहे
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी गुगलच्या लोकप्रिय Facebook, Insta, WhatsAPP सेवा तात्पुरत्या बंद झाल्या होत्या. पाठोपाठ आता Gmail सेवाही आज डाऊन झाल्याचे समोर आले आहे. देशातील अनेक ठिकाणी जी-मेल युझर्सना कोणताही मेल येत नाही किंवा पाठवताही येत नाही. त्यामुळे ट्विटरवर आता जी-मेल डाऊनच्या तक्रारींचा पूर आला आहे. ट्विटरवर #GmailDown टॉप ट्रेंडवर आहे. यूजर्स या टॅगच्या माध्यमातून ट्विट करत आपली समस्या मांडत आहेत. अशी बातमी  'दि इकॉनॉमीक टाइम्स' दैनिकात प्रकाशित झाली आहे.

गुगलच्या माध्यमातून जी-मेल ही सेवा मोफत सेवा दिली जाते. मात्र भारतात आत्ता जी-मेल सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे वापरकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. काही वापरकर्त्यांना सर्व्हर कनेक्शन तर काहींना लॉ़गिन करताना अडचणी येत आहेत. भारतातही काही यूजर्सला जी-मेल वापरताना अडचणी येत आहेत. डाउन डिटेक्टरनुसार, ६८ टक्के यूजर्सने वेबसाइट ओपन करताना अडचणी येत आहेत. १८ टक्के यूजर्सनी सर्व्हर कनेक्शन आणि १४ टक्क्यांनी लॉग इन समस्या येत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर २०२० रोजीही जी-मेल सेवा डाऊन झाली होती.

तर ४ ऑक्टोबरला प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, WhatsApp आणि Instagram जवळपास ६ तास ठप्प झाले होते. यावेळी या कोणत्याही अॅपमधून मेसेज जात नव्हते किंवा येत नव्हते. ६ तासांच्या डाऊननंतर पहाटे ३ च्या सुमारास Facebook, WhatsApp आणि Instagram पून्हा सुरु झाले.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.