Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
सणासुदीच्या काळात पेट्रोल डिझेलचा High jump
12-Oct-2021, 4:31:33 pm
Edited by - Pravin wankhede
ऑक्टोबर सुरू होताच देशभरात सणासुदीला सुरुवात होते, अशा सणासुदीच्या काळात इंधनाचे hight jump  करणे सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत संतत गतीने वाढ होत आहे
Abhijeet Bharat

नागपूर: ऑक्टोबर सुरू होताच देशभरात सणासुदीला सुरुवात होते, अशा सणासुदीच्या काळात इंधनाचे hight jump  करणे सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत संतत गतीने वाढ होत आहे. आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्याने याचा पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला असल्याचे सांगितल्या जात आहे.

पेट्रोलच्या पाऊलावर- पाऊल ठेवत आता डिझेलनेही शंभरीकडे वाटचाल केली आहे. पेट्रोलची किंमत हळूहळू वाढत चालली आहे. तर डिझेलच्या किंमतीत कालच ३५ पैशांनी वाढ झाली आहे. या महिन्याच्या १० दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किंमतीत जवळपास ३०-३५ पैशांनी वाढ झाली आहे.

Abhijeet Bharat

तेल कंपनी IOCL च्या माहितीनुसार, दिल्लीतत एक लीटर पेट्रोलसाठी १०४.४४ रुपये मोजावे लागत आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर हे दिल्लीहून अधिक आहेत. मुंबईत एक लीटर पेट्रोलचे दर ११०.४१ रुपये इतके आहेत. तर एक लीटर डिझेलसाठी मुंबईकरांना १०१.०३ रुपये माजावे लागत आहेत. दिल्लीत डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडला नसला तरी दिल्लीत एक लीटर डिझेलसाठी ९३.१७ रुपये मोजावे लागत आहेत.

तर नागपूरकरांना एक लिटर पेट्रोलसाठी प्रति लीटर  ११० रुपयांच्या वर पैसे मोजावे लागत आहे. इतर शहरांच्या तुलनेत नागपुरात पेट्रोल आणि डिझलच्या किंमती अधिक आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होता असल्याने निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वाहनांची संख्या रस्त्यावर वाढल्याचे दिसून येत आहे. अशात पेट्रोलची किंमत ११० रुपयांच्या वर झाल्याने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. 

ऑक्टोबर महिन्यात इंधन दरवाढीचा भडका उडाल्याचे पहायला मिळाले. मुंबई आणि हैद्राबादनंतर गुजरातमध्ये डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. भोपाळ, रायपूर आणि जयपुरमध्ये डिझेलच्या किंमती १०० पार गेल्या आहेत. मागील सात दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.