Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
स्कूटर रॅली काढत बंदला दिले समर्थन
11-Oct-2021, 6:34:51 pm
Edited by - Pravin wankhede
लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी कडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. आज महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या. 
Abhijeet Bharat

नागपूर: लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी कडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. आज महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारला  इशारा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात उत्तर नागपूर काँग्रेस कँमिटीद्वारे स्कुटर रैली काढून जनतेला बंदची हाक देण्यात आली.

जनेतेने स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन स्कूटर रॅली द्वारे करण्यात आले. मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद करण्याकरिता विनंती करण्यात आली. यावेळी कृष्णकुमार पांडे, रत्नाकर जयपुरकर, सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, अजित सिंग, आसिफ शेख, सतीश पाली, विजया हजारे, गौतम ‍अंबादे, चेतन तरारे, सचिन वासनिक, निलेश खोब्रागडे, प्रफुल किरपाने, राकेश ईखार, अनिरुद्ध पांडे, चेतन मेश्राम, राँयल गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

या दरम्यान मोदी सरकार आणि योगी सरकारच्या विरोधात नारे-निर्देशने करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. सबंध देशभर जनतेमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकरी आणि कामगार, भारताच्या विकास रथाची ही दोन चाके आहेत यांचा मान सम्मान हा राखला गेलाच पाहिजे, असे प्रतिपादन यावेळेस कुणाल राऊत यांनी केले.

 

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.