Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
दसऱ्याला ६ दिवसांची सुट्टी! केवळ १० हजारांमध्ये जाता येणार 'या' सुंदर पर्यटन ठिकाणांवर, आजच करा प्लॅन
11-Oct-2021, 6:10:17 pm
Edited by - Pravin wankhede
जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांना गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या घरातच कैद राहावे लागले आहे. प्रवास-पर्यटनासाठी नेहमीच उत्सुक आणि हौशी असलेल्या लोकांच्या लॉकडाऊनमुळे सर्व इच्छाही नष्ट झाल्या.
Abhijeet Bharat

जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांना गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या घरातच कैद राहावे लागले आहे. प्रवास-पर्यटनासाठी नेहमीच उत्सुक आणि हौशी असलेल्या लोकांच्या लॉकडाऊनमुळे सर्व इच्छाही नष्ट झाल्या. परंतु, आता देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्यामुळे बरीच पर्यटन स्थळे खुली झाली आहेत. त्यात पुढचा आठवडाही सुटीचा आहे. सलग ५-६ दिवसांची सुट्टी मिळत असल्यामुळे सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. 

Abhijeet Bharat

१४ ऑक्टोबर रोजी रामनवमी आणि १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याची सुट्टी आहे. तसेच १६ ऑक्टोबरला शनिवार आणि १७ ला रविवार आहे. यानंतर १९ ऑक्टोबरला ईद-ए-मिलादची सुट्टी आहे. जर तुम्ही ऑफिसमधून १८ ऑक्टोबरची सुट्टी घेऊ शकत असाल तर सहज सहा दिवसांसाठी तुम्हाला पर्यटनासाठी जाता येईल. दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे लोक केवळ १० हजार रुपयांमध्ये भारतातील काही सुंदर ठिकाणांवर पर्यटनासाठी नक्कीच जाऊ शकतात.

कांगोजोडी गाव, हिमाचल प्रदेश : जर तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य जवळून पाहायला आवडत असेल तर हिमाचल प्रदेशातील कांगोजोडी गावाला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. सिरमौर जिल्ह्यातील या गावात जाण्यासाठी तुम्हाला दिल्लीपासून सुमारे २७५ किमी प्रवास करावा लागेल. येथील सुंदर दृश्ये काही वेळातच सर्व थकवा दूर आणि मन प्रसन्न करतात.

लॅन्सडाउन, उत्तराखंड : जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवायचा असेल तर एकदा लॅन्सडाउनला नक्की भेट द्या. दिल्लीपासून या सुंदर ठिकाणाचे अंतर केवळ २७९ किलोमीटर आहे. येथे कॅम्पिंग ते जेवण आणि राहण्यापर्यंतचा सर्व खर्च १० हजारांच्या आत असेल.

पिथौरागढ, उत्तराखंड : हे प्रसिद्ध ठिकाण दिल्लीपासून ४६३ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाला हिल स्टेशन म्हणता येणार नाही, परंतु बाराही महिने येथील हवामान खूप चांगले राहते. डोंगरांनी वेढलेल्या या शहराचे सौंदर्य बघतच राहावेसे वाटते.

शिवपुरी, उत्तराखंड : ऋषिकेश पौराणिक धार्मिक स्थळे आणि आश्रम व्यतिरिक्त, उंच पर्वत आणि घनदाट जंगलांसाठी देखील ओळखले जाते. हे ठिकाण दिल्लीपासून २४४ किमी अंतरावर आहे. शिवपुरी त्यापासून थोड्याच अंतरावर आहे. येथे वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीत तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय बंजी जंपिंग, वॉटरफॉल, क्लाइंबिंग आणि ट्रेकिंगसाठीही तुम्ही येथे जाऊ शकता.

शोघी, हिमाचल प्रदेश : हनीमून जोडप्यांमध्ये हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी येथे येत असलेल्या लोकांनाही या ठिकाणाचा साधेपणा आवडतो. शोघी एक हिल स्टेशन असून हिमाचल प्रदेशातील शिमलापासून हे ठिकाण केवळ १६ किमी अंतरावर आहे.

मुक्तेश्वर, उत्तराखंड : हे ठिकाण सुंदर असण्याव्यतिरिक्त देखील खूप स्वच्छ देखील आहे. येथे जाऊन तुम्ही स्वच्छ आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. हे एक हिल स्टेशन असून उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून २,२८५ मीटर उंचीवर वसलेले हे एक सुखद ठिकाण आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बाइकिंग, राफ्टिंग करू शकता. दिल्ली- एनसीआरमध्ये राहणारे लोक १० हजार रुपयांमध्ये येथे आरामात प्रवास करू शकतात.

भरतपूर पक्षी अभयारण्य, राजस्थान : भरतपूर पक्षी अभयारण्य हे जगातील सर्वोत्तम पक्षी अभयारण्य उद्यानांपैकी एक आहे. याला केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते. हे अभयारण्य राजस्थानमध्ये आहे. येथे तुम्हाला पक्ष्यांच्या हजारो दुर्मिळ आणि नामशेष प्रजाती पाहायला मिळतील.

रानीखेत, उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये स्थित रानीखेत एक एक भव्य हिल स्टेशन आहे. जर तुम्हाला निसर्गासोबत वेळ घालवायला आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. येथे तुम्ही पॅराग्लायडिंग, बाइकिंग, राफ्टिंग देखील करू शकता. येथे तुम्ही रानीखेतच्या झुला देवी मंदिरालाही भेट देऊ शकता.

Abhijeet Bharat

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.