Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
पान मसाला ब्रॅंडची जाहिरात करणार नाही; वाढदिवसाच्या दिवशी बिग बींची मोठी घोषणा
11-Oct-2021, 5:00:28 pm
Edited by - Pravin wankhede
भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. त्यांनी आज वयाच्या ८० व्या वर्षीत पदार्पण केले. वाढदिवसाच्या प्रसंगी अमिताभ यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रसिद्ध पान मसाला ब्रँडची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्यासोबतचा करारही संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली आहे.
Abhijeet Bharat

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. त्यांनी आज वयाच्या ८० व्या वर्षीत पदार्पण केले. वाढदिवसाच्या प्रसंगी अमिताभ यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रसिद्ध पान मसाला ब्रँडची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्यासोबतचा करारही संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांनी कोटींचे शुल्कही परत केले आहे. तंबाखूजन्य पदार्थांविरोधात मोहीम राबवणाऱ्या संस्थेच्या आवाहनावर बिग बींनी हे मोठे पाऊल उचलले आहे.

Abhijeet Bharat

अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ब्रँड कमला पसंद सोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्यांच्या टीमकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'जाहिरातीचे प्रसारण झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि गेल्या आठवड्यात त्यांच्यासोबतच करार संपुष्टात आणला. यामागील कारणानुसार, जेव्हा बिग बी या जाहिरातीशी जुळले तेव्हा त्यांना ही जाहिरात सरोगेट जाहिरातीत येत असल्याची कल्पना नव्हती. निवेदनात म्हटले आहे की, अमिताभ बच्चन यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे आणि प्रमोशनसाठी मिळालेले शुल्कही परत केले आहे. 

दरम्यान, बऱ्याच काळापासून वापरकर्ते अमिताभ बच्चन यांच्याकडेही सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा उत्पादनांची जाहिरात न करण्याची मागणी करत आहेत. काही वेळापूर्वी एका वापरकर्त्याने बिग बी यांना फेसबुकवर विचारले होते की, पान मसाला ब्रँडची जाहिरात करण्याची त्यांना काय गरज आहे? मग छोट्या कलाकारांमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक असेल? यावर बिग बींनी उत्तर दिले - मला तुमची माफी हवी आहे. परंतु, यातून मला पैसे मिळतात. या व्यवसायात बरेच लोक आहेत जे कामगार आहेत आणि त्यांनाही त्यातून पैसे मिळतात.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.