Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
पाणी मागणाऱ्या शेकऱ्यांवर गोळ्या झाडणारे हे लोक नैतिकतेची गोष्ट करताय: देवेंद्र फडणवीस 
11-Oct-2021, 3:11:21 pm
Edited by - Pravin wankhede
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला महाराष्ट्र बंद करण्याची नैतिकता आहे का? असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केला आहे. (Devendra Fadnavis sharply criticized the state government)
Abhijeet Bharat

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला महाराष्ट्र बंद करण्याची नैतिकता आहे का? असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केला आहे. लखीमपुर खीरीच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्यात येतो परंतु, महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या पैशाची मदत करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपुर्व संकटात असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 


Video बघा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील सरकारला आंदोलन करण्याची नैतिकता आहे का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा असून आता ढोंगीपणा जगासमोर उघड झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. लखीमपुरच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्यात येतो. परंतु राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या पैशाची मदत करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
 
महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या घोषणा केल्या, नुकसानीची मदत करण्याच्या घोषणा केल्या त्या हवेत विरल्या आहेत. अजून शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तींवर मदत केली नाही. ज्या शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे ती, तोकडी पडली आहे. शेवटी एका घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की, पुर्वीच्या फडणवीस सरकारने चांगली मदत केली. आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.