Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
महाराष्ट्र बंदची हाक 'या' संघटनांचा पाठिंबा
11-Oct-2021, 12:38:15 pm
Edited by - Pravin wankhede
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहेया प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे
Abhijeet Bharat

नागपूर:  उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्र सरकार कडून व भाजपशासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे, भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनी लाही लाजवेल अशा प्रकारचे असून, लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यांना सामूहिक रित्या ठार मारण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडची आठवण करून देणारी असल्याचे सांगितल्या जात आहे. 

या प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यातील सर्व घटकांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आज बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.

सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. या बंदला विविध व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला असून, काही संघटनांनी बंदला नकार दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ३ पक्षांनी पुकारलेल्या या बंदला विविध शहरांतील व्यापाऱ्यांनी मात्र आक्रमकपणे विरोध दर्शवला आहे. तर 'मुंबई डबेवाला असोसिएशन'ने या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र बंदला मनसेचा तीव्र विरोध
महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील  मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र भाजप आणि मनसेने  या बंदला तीव्र विरोध केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले.

किसान सभेचा महाराष्ट्र बंदला सक्रिय पाठिंबा

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. सबंध देशभर जनतेमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

 

महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा 

महाविकासआघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राखा यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची अनेक संघटना असलेल्या रिटेल व्यापारी संघाने मात्र उद्याच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून ते काम सुरूच ठेवणार असल्याचं रिटेल व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले आहे.  फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशन (FRTWA) नं देखील बंदला पाठिंबा दिला आहे, दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवणार आहे. FRTWA चे अध्यक्ष वीरेन शाह यांनी ही माहिती दिली आहे.

स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडून बंदला विरोध

'आतापर्यंत जे बंद झाले त्यास कधीही सरकारने दुजोरा दिला नाही. आता आपल्याच पार्टीचे सरकार आहे. तरी कृपया महाराष्ट्रातील तमाम जनतेला बंद करून वेठीस धरू नका. सरकार आपलेच आहे, पोलीसही आपलेच आहेत आणि बंद देखील आपल्याच सरकारमधील तिन्ही पक्षांनी केला आहे .आतापर्यंतच्या अनुभवानुसार सरकार बंद हाणून पाडते. परंतु ह्या खेपेस बंद पुकारणारेच बंदची अंमलबजावणी करणार? आम्ही दाद कोणाकडे मागायची? आधीच नुकसानग्रस्त असताना सगळ्यांना मदतीची गरज असताना बंद पुकारणे योग्य नाही. शेतकऱ्यांपासून लघुउद्योग, व्यापारी व ज्यांचे हातावर पोट आहे या सर्वांना नुकसान भरपाई कोण देणार?' असा उद्विग्न सवालही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडून उपस्थित करण्यात आला आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांचा बंदला पाठींबा

अभिनेता सयाजी शिंदे यांनी लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहेत, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील सोमवार आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे, तरी यासंदर्भात महा विकास आघाडी सरकारमधील घटक पक्षातील नेते पदाधिकारी यांच्यासमवेत महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे महाविकास आघाडीच्या सर्व सहयोगी पक्षांतर्फे आमदार दुष्यंत चतुर्वेदी ,संपर्क प्रमुख शिवसेना नागपूर आमदार विकास ठाकरे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपूर शहर, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे महानगर प्रमुख शिवसेना,धुनेश्वर पेठे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस नागपुर शहरतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

तर नागपूर बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी नागपुरातील नागरिक, व्यापारी, कर्मचारी आणि वाहतूकदारांना आवाहन केले आहे की, देशाच्या अन्नदात्याच्या सन्मानार्थ त्यांच्या हक्कांसाठी न्याय मिळवण्यासाठी बंद यशस्वी करावे, शहरातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिका तर्फे घोषित महाराष्ट्र बंद ला सफल करण्यासाठी वेरायटी चौकात एकत्रित होवून महाविकास आघाड़ी  कार्यकर्ते जागर करणार आहे.

'आशा' वर्कर यांचा पाठिंबा

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) नागपूर जिल्हा तर्फे ए.के.गोपालन भवन येथे आयोजित सभेत प्रमुख अतिथी अरुण लाटकर यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद ला पाठिंबा दर्शवून कामबंद आंदोलन करत महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे. अशी घोषणा  केली आहे. नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन CITU च्या दोन दिवस चाललेल्या नाशिक मधील राज्यस्तरीय मिटिंगच्या तसेच मुंबई येथे आरोग्य सहसंचालक महेश बोटले व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत झालेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देण्याकरिता ए.के.गोपालन भवन येथे आशा वर्कर यांची सभा पार पडली. 

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.