Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
रशियात भीषण विमान अपघात १६ जणांचा मृत्यू
10-Oct-2021, 6:00:46 pm
Edited by - Pravin wankhede
रशियातील तातरस्तान शहरात एल ४१० टर्बोलेट विमानाचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत
Abhijeet Bharat

मास्को: रशियातील तातरस्तान शहरात एल ४१० टर्बोलेट विमानाचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातरस्तान इथं मॉस्कोतील प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या विमानातून एकूण २३ प्रवासी प्रवास करत होते. मात्र तातरस्तानमधील मेन्झेलिन्स्क शहरात हे विमान क्रॅश झाल्याचे वृत्त TASS या रशियन वृत्तसंस्थेनं दिलं आहे. हा विमान अपघात इतका भीषण होता की, विमानाचे चक्क दोन तुकडे झाले आहेत.

आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, पॅराशूटने जंप करणारा एक समुह विमानातून प्रवास करत होता. यावेळी अपघातग्रस्त विमानातून सात जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन इंजिन असणारे शॉर्ट-रेंज ट्रांसपोर्ट असणारे हे एल -410 टर्बोलेट असं हे एअरक्राफ्ट होते.

अलिकडेच रशियन विमान सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. परंतु दुर्गम भागात जुन्या विमानांमुळे अपघात होत आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात रशियाच्या सुदूर पूर्वेमध्ये एक जुना एंटोनोव्ह एन -26 एंटोनोव्ह विमान कोसळले दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर जुलैमध्ये कामचटका येथे एका विमान अपघातात एकूण २८ प्रवासीठार झाले होते.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.