Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
शाब्बास! या ५५ वर्षीय महिलेने केले ४२० किलोमीटर्सचे अंतर सायकलने पार
10-Oct-2021, 5:06:34 pm
Edited by - Pravin wankhede
आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द माणसाकडून अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकते, “काही मिळवण्याची इच्छा, आकांक्षा” असणे आवश्यक आहे, असाच विचार करून राजस्थानच्या या महिलेने ज्या वयात लोक निवृत्तीकडे वाटचाल करतात त्या वयात चक्क सायकलने १८ हजार फूट उंचीवर ४२० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. विशेष म्हणजे त्या ५५ वर्षांच्या आहेत.
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द माणसाकडून अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकते, “काही मिळवण्याची इच्छा, आकांक्षा” असणे आवश्यक आहे, असाच विचार करून राजस्थानच्या या महिलेने ज्या वयात लोक निवृत्तीकडे वाटचाल करतात त्या वयात चक्क सायकलने १८ हजार फूट उंचीवर ४२० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. विशेष म्हणजे त्या ५५ वर्षांच्या आहेत.

महिलांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तिने एकदा ठरवले तर  कोणतेही अडथळे तिला थांबवू शकत नाहीत, याचेच प्रत्यक्ष उदाहरण रेणू  शशिकांत सिघी यांनी ठेवले आहे. रेणू सिघी यांनी १८ हजार फूट उंचीवर श्रीनगर ते लेह हे सुमारे ४२० किलोमीटर्सचे अंतर सायकलवरून पार करण्याचा विक्रम केला आहे.

जयपूर सायकलिंग क्लब व जोधपूर बायसिकलिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सायकल फेरीत राजस्थानच्या ७ सायकलपटूंनी भाग घेतला होता. त्यात रेणू सिघी या एकमेव महिला सायकलपटू होत्या. अत्यंत दुर्गम, डोंगराळ व प्राणवायुची कमतरता भासणाऱ्या या प्रदेशात सायकल चालविणे अतिशय आव्हानात्मक आहे; मात्र रेणू यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणू सिघी यांनी आतापर्यंत अनेक कठीण स्पर्धा जिंकल्या आहेत.

कोण आहेत रेणू सिघी

दोन नातवंडे असणाऱ्या रेणू सिघी यांनी वयाच्या ५०व्या वर्षी तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलिंगला सुरुवात केली व जयपूर सायकलिंग क्लबमध्ये सहभागी झाल्या. २६ सप्टेंबर रोजी श्रीनगर ते लेह सायकल फेरीला सुरुवात झाली. सोनमर्ग, कारगिल, बुध खरबू, सासपोलमार्गे लेहमध्ये ही फेरी समाप्त झाली. दररोज ८० ते १२० किलोमीटर सायकलिंग केले जात होते. लेहनंतर ते २ ऑक्टोबर रोजी समुद्रसपाटीपासून १८ हजार फुट उंचीवर असलेल्या खारदुंगला येथे गेले. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी परतपूर आणि तुर्तुक येथे आल्यानंतर त्यांचा हा प्रवास पूर्ण झाला.

Abhijeet Bharat

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.