Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
सरकार विरोधात आवाज उठविला तर...म्हणत जयंत पाटीलांनी केले टीका
10-Oct-2021, 3:44:06 pm
Edited by - Pravin wankhede
 पुणे पदवीधर निवडणुकीत प्रथम पसंतीच्या विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार अरुण अण्णा लाड यांचा भव्य नागरी सत्कार कुंडल येथे आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील जयंत  कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
Abhijeet Bharat

सांगली: पुणे पदवीधर निवडणुकीत प्रथम पसंतीच्या विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार अरुण अण्णा लाड यांचा भव्य नागरी सत्कार कुंडल येथे आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील जयंत  कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशात सरकार विरोधात काही बोलले तर थेट चौकशीला सामोरी जावं लागत असं जयंत पाटील म्हणाले.

 

तसेच दररोज इंधन दरवाढ करण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. आपल्या भारतातील शेतकर्‍याला चार पैसे जास्त मिळाले पाहिजे अशी मानसिकता आपल्या सरकारची नाही. नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात काम करून त्यांचा गळा घोटण्याचे काम भाजपा करत आहे. देशातील आजची परिस्थिती बदलली आहे. लखीमपुर सारख्या भागात लोकांना चिरडून टाकण्याची मानसिकता भाजपाची झाली आहे. देशाला एका वेगळ्या दिशेने नेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सरकार विरोधात आवाज उठविला तर लगेच चौकशीचा ससेमिरा मागे लागतो.

 देशात आज सरकार विरोधात आवाज उठविला तर लगेच विविध चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. कोणतेही पुरावे नसताना देखील आज राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. लखीमपूर घटनेची तुलना जेव्हा शरद पवार साहेबांनी जालियनवाला बाग हत्याकांडशी केली, त्यानंतर देशातील सरकारने अजित पवार यांची चौकशी करण्याचे काम केले. त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. ईडीला भाजपचे नेते मार्गदर्शन करत आहेत, त्यानुसार सध्या राज्यात धाडसत्र सुरु आहे, अशी टीका जयंत पाटलांनी भाजप नेत्यांवर केली.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.