Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
धक्कादायक! धावत्या रेल्वेगाडीत २० वर्षीय महिलेचा बलात्कार
10-Oct-2021, 3:49:31 pm
Edited by - Pravin wankhede
लखनौ ते मुंबई या धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली
Abhijeet Bharat

नाशिक: देशभरात महिलांविषयी गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. विनयभंग, बलात्कारसारख्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे,  चक्क चालत्या रेल्वेगाडीत लूट करून बलात्कार करण्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही घटना लखनौवरून मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ ते मुंबई या धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली. झाले असे की, लखनौ- मुंबई पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना काही लोक या एक्स्प्रेसमध्ये चढले. एक्स्प्रेसने इगतपुरी स्थानक सोडताच या लोकांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलांची छेड काढण्यास सुरुवात करीत अनेक महिलांचा विनयभंग केला. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणार्‍या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. गाडीतील १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटत त्यांच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून  घेतली. यावर दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी पतीसोबत प्रवास करणार्‍या २0 वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. कसारा घाटात दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.

Abhijeet Bharat

कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या मधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कसारा स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. यातील आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटीमध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहतो. नशेच्या अमलाखाली त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.