Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
लखीमपूर खीरी हिंसाचारातील मुख्य आरोपीला अटक
10-Oct-2021, 1:50:14 pm
Edited by - Pravin wankhede
लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा याची एसआयटीच्या पथकाकडून सुमारे ११ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली आहे.
Abhijeet Bharat

लखनौ: लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा याची एसआयटीच्या पथकाकडून सुमारे ११ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य न करता अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावात भरधाव वाहन घुसवून केल्या हिंसाचारप्रकरणी आशिष मिश्राविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आशिष मिश्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकासमोर हजर झाला होता. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील सुमारे नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची जवळपास ११ तास सखोल चौकशी केली. यावेळी त्याला तीन डझनहून अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नाहीत. यानंतर त्याला आता न्यायालयात हजर केले जाईल असे उत्तर प्रदेशचे डीआयजी उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले.

आरोपी आशिष मिश्राला अटक करण्यात आल्याच्या माहितीला राज्य पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाचे प्रमुख उपेंद्र अगरवाल यांनी दुजोरा दिला आहे. आरोपी आशिषच्या अटकेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया देत सांगितले की, १२ तारखेला आम्ही बैठकीचे आयोजन केले आहे. परंतु ते आधी तुरुंगात जाऊ दे. त्यानंतर ते कोणत्या विभागात पाठवत आहेत ते पाहू. १५ तारखेला पुतळा जाळला जातो. त्यांच्या वडीलांचे अर्थात संजय मिश्रा यांचे प्रकरण आहे. त्यांना निलंबित का केले जात नाही? असा सवाल उपस्थित केला. लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटार घुसवून हिंसाचार घडवण्यात आला होता. या हिंसाचारात मोटारीखाली चिरडून शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.  

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.