Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
शाहरूख खानच्या ड्रायव्हरला NCB चे समन्स
09-Oct-2021, 7:41:25 pm
Edited by - Pravin wankhede
कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज सेवन (Cordelia cruise) करण्याच्या प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे
Abhijeet Bharat

मुंबई:  कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज सेवन करण्याच्या प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या संदर्भात अभिनेता  शाहरूख खानच्या ड्रायव्हरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने समन्स पाठवला आहे. या समन्समुळे शाहरूख खानचा ड्रायव्हर सध्या एनसीबी कार्यालयात आला असल्याचे सांगितल्या जात आहे. शाहरूखच्या ड्रायव्हरसोबतच चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री यालाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. शुक्रवारी इम्पियाज खत्रीच्या कार्यालयावर तसेच घरावर एनसीबीने धाड टाकली होती. त्याचीही चौकशी या प्रकरणी सकाळपासूनच सुरू आहे.
 
एनसीबीने न्यायालयात सादर केलेल्या पंचनाम्याच्या कागदपत्रांमुळे शाहरूख खानची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. या पंचनाम्यानुसार आर्यन खानने चरस घेतल्याचे चौकशीत कबुल केले आहे. त्याचा मित्र अरबाज मर्चंटसोबत कॉर्डेलिया क्रूझवर चरस घेतले असल्याचे आर्यनने कबुल केले आहे. त्यानंतरच आर्यनला अटक करण्यात आली होती. अरबाजच्या बुटात ड्रग्ज लपवण्यात आले होते. चौकशीदरम्यान एनसीबीने हे ड्रग्ज ताब्यात घेतले.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.