Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
CM Uddhav Thackeray & Narayan Rane: शेजारी बसूनही एकमेकांकडे दुर्लक्ष
09-Oct-2021, 5:51:02 pm
Edited by - Pravin wankhede
सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) प्रामुख्याने उपस्थित होते.
Abhijeet Bharat

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे, मंचावर दोघांची खुर्ची अगदी आजुबाजूलाच ठेवण्यात आली होती, मात्र दोघांनीही एकमेकांकडे पाहिले देखील नाही.

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय वैर हा सर्वश्रृत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्यातील वादाचा अनुभव आहे. आज अनेक वर्षांनंतर दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान या दोघांमध्ये संवाद होणार का? याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र दोघांनी एकमेकांना नमस्कारही घातला नाही. एकमेकांच्या बाजुला बसून देखील या दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही.

नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. दरम्यान हे दोघे आज एकाच व्यासपीठावर येतील. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली होती. मात्र, आता ते बॅकफूटवर गेले असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमात कोणतेही राजकारण करणार नसल्याचे नारायण राणेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच कार्यक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य आमच्याकडून घडणार नसल्याचेही राणे म्हणाले आहेत.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.