Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
IT Raids: प्रकरणावर म्हणले अजित पवार... तर कुठल्या स्तरावर जाऊन राजकारण होतंय/VIDEO
07-Oct-2021, 5:12:23 pm
Edited by - Pravin wankhede
अजित पवारांचे ( Ajit Pawar ) नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर कुठल्या स्तरावर जाऊन या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातोय त्यामुळे राज्यातील जनतेने या गोष्टीचा विचार जरूर केला पाहिजे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडले. 
Abhijeet Bharat

मुंबई - अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर कुठल्या स्तरावर जाऊन या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातोय त्यामुळे राज्यातील जनतेने या गोष्टीचा विचार जरूर केला पाहिजे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडले. आयकर विभागाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर धाडी टाकल्या आहेत. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता आयकर विभागाने धाडी टाकल्याचे वृत्त खरे आहे असे सांगितले.

नेमकं काय म्हणाले अजित पवार...VIDEO 

आयकर विभागाने इतर कंपन्यांवर धाडी टाकल्या त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही ते त्यांना योग्य वाटेल ते करु शकतात परंतु ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्यावर धाडी टाकल्या त्याचं वाईट वाटलं असेही अजित पवार म्हणाले. अनेक सरकारे येत जात असतात शेवटी जनता सर्वस्व आहे. जनता योग्य निर्णय घेते. मागील निवडणुकीच्या अगोदर पवारसाहेबांचा बँकेशी संबंध नसतानाही ईडीने नोटीस काढले होते. त्यातून रामायण म्हणा किंवा राजकारण म्हणा घडलं आणि जनतेने बोध घेतला असे सूचक विधानही अजित पवार यांनी यावेळी केले.

आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना शंका आली म्हणून त्यांनी छापेमारी केली. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत कारण मी स्वतः अर्थमंत्री आहे. आर्थिक शिस्त कशी लावायची... कर चुकवायचा नाही... कर व्यवस्थितपणे कसा भरायचा हे मला माहीत आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माझ्या संबंधित सर्व कंपन्यांचे कर व्यवस्थितपणे... वेळच्या वेळी भरले जातात. त्यात काही अडचण नाही. तरी मी म्हणून उपयोग नसतो. आता ही राजकीय हेतूने धाड टाकली की आयकर विभागाला आणखीन काही माहिती हवी होती ते आयकर विभागाच सांगू शकतील असेही अजित पवार म्हणाले. माझ्या संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर काही म्हणायचं नाही कारण मी एक नागरिक आहे. मात्र एका गोष्टीचं दु:ख आहे की, माझ्या बहिणी ज्यांची ४० वर्षापूर्वी लग्न झाली. सुखाने संसार करत मुलं आहेत त्यांची लग्न होवुन नातवंड आहेत. एक बहीण कोल्हापूर आणि दोन बहिणी पुण्यात आहेत त्यांच्यावर धाडी टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण समजू शकलं नाही अशी शंकाही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.