Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
IT Raids: अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर धाडी
07-Oct-2021, 3:43:20 pm
Edited by - Pravin wankhede
गुरुवारी सकाळीपासून साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर कारखाना, नगरमधील अंबालिका आणि नंदूरबारमधील पुष्पदंतेश्वर या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
Abhijeet Bharat

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी IT विभागाने छापेमारी केली आहे. गुरुवारी सकाळीपासून साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर कारखाना, नगरमधील अंबालिका आणि नंदूरबारमधील पुष्पदंतेश्वर या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर आज आयकर विभागाने या कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर छापे टाकले आहेत. यामुळे या कारवायांना राजकीय संबंध आहेत का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. कारण ज्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरांवर छापे मारण्यात आले आहेत, ते सर्व अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या कारवाईने अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे.  

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.