Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
ZP Election Result: धुळ्यात BJP, अकोल्यात VBA, तर नागपुरात congress विजयी
06-Oct-2021, 5:51:34 pm
Edited by - Pravin wankhede
ZP Election Result : राज्यात विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 तर पंचायत समितीच्या 144 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. आज या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत मिळालेल्या माहिती नुसार, धुळ्यात BJPने वर्चस्व कायम राखले आहे. तर अकोल्यात वंचित बहुजन आघाडी, आणि नागपुरात  काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीत सरासरी ६३ टक्के मतदान झाले होते.
Abhijeet Bharat

नागपूर:  राज्यात विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 तर पंचायत समितीच्या 144 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. आज या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत मिळालेल्या माहिती नुसार, धुळ्यात BJPने वर्चस्व कायम राखले आहे. तर अकोल्यात वंचित बहुजन आघाडी, आणि नागपुरात  काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीत सरासरी ६३ टक्के मतदान झाले होते.

Related News -

बुधवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली, यात धुळ्यात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा पहिलाच निकाल BJPच्या बाजूने लागला. लामकानी गटात धरती निखिल देवरे यांनी ४ हजार २९६ मतांनी विजय मिळवला. तर शिरपूर तालुक्यातल्या सर्व सहा गणांमधे भाजपा उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषेदच्या ११ गटाचे निकाल हाती आले असून, त्यापैकी भाजपानं ७ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस दोन, तर काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे.

शिवसेनेच्या शालिनी भदाणे बोरकुंड गटातून आधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. नंदूरबार जिल्ह्यात म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे यांनी विजय मिळवत खातं उघडलं. जिल्हा परिषदेच्या ११ गटांचे निकाल हाती आले असून त्यात भाजपानं ४, शिवसेना आणि काँग्रेसनं प्रत्येकी ३, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं १ जागा जिंकली आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या १० जागांचे निकाल हाती आल्या आहेत. त्यात भाजपाने ४, शिवसेना ३, राष्ट्रावादी २, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट  पक्षानं १ जागा जिंकली आहे. वाशिम जिल्ह्यात  सर्व १४ जागाचे निकाल हाती आले. त्यात राष्ट्रनवादी काँग्रेसनं ५, काँग्रेस, भाजपा, आणि वंचित आघाडी प्रत्येकी २, तर शिवसेना आणि जनविकास आघाडी  यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

नागपुरात काँग्रेसचे वर्चस्व


नागपूर जिल्हा परिषदेच्या ९ जगाचे निकाल जाहिर झाले आहेत. त्यात ६ जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. भाजपा, शेकाप, आणि गोंगापा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

यात हिंगणा (निलडोह ): संजय जगताप (काँग्रेस)
हिंगणा (डिगडोह ): रश्मी कोटगुले ( राष्ट्रवादी काँग्रेस)
हिंगणा (इसासनी): अर्चना गिरी (भाजपा)
मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)
काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)
काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)
कामठी(गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)
कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)
नागपूर (गोधनी): कुंदा राऊत (काँग्रेस)
रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )
पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)
नरखेड (सावरगाव): पार्वता गुणवंत काळबांडे (भाजपा)
सावनेर (वाकोडी): ज्योती सिरसकर (काँग्रेस)
सावनेर (केळवद ): सुमित्रा मनोहर कुंभारे (काँग्रेस)
नरखेड (भिष्णूर): बाळू जोध ( राष्ट्रवादी काँग्रेस)
कुही (राजोला): अरुण हटवार (काँग्रेस)

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.