Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
अनुसूचित जातीतील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुदान योजना
05-Oct-2021, 2:48:45 pm
Edited by - Pravin wankhede
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) विशेष अनुदान  योजनेतंर्गत अनुसूचित जातीतील इयत्ता दहावीमध्ये 90 पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना MS-CIT, NEET, JEE इत्यादी व्यावसायिक उच्चशिक्षणाची पूर्वतयारी करता यावी, यासाठी ही योजना असून मार्च 2021 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना  ही लागू आहे.
Abhijeet Bharat

अमरावती: :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान  योजनेतंर्गत अनुसूचित जातीतील इयत्ता दहावीमध्ये 90 पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना MS-CIT, NEET, JEE इत्यादी व्यावसायिक उच्चशिक्षणाची पूर्वतयारी करता यावी, यासाठी ही योजना असून मार्च 2021 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना  ही लागू आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा. यासाठी पालकांनी स्वघोषणापत्र देणे गरजेचे आहे.

सोबतच विद्यार्थी / वडील यांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता दहावीची गुणपत्रिका, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र इत्यादी कागदपत्रांची साक्षांकित प्रतीसह अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी पत्रकाद्वारे केले आहे. अर्जाच्या अनुषंगाने अटी, शर्ती व कार्यपद्धती तसेच अर्जाचा नमुना याबाबत अधिक माहितीसाठी बार्टीचे संकेतस्थळ  http://barti.in/notice-board.php  यावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

  

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.