Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
अतिवृष्टीमुळे ११ हजारावर शेतकर्‍यांचे नुकसान
05-Oct-2021, 2:19:09 pm
Edited by - Pravin wankhede
जिल्ह्यात अतवृष्टीमुळे रस्ते, पूल, शेती व अन्य झालेल्या नुकसानासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तातडीने पाठवावे. याबाबत आपण स्वत: पाठपुरावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
Abhijeet Bharat

नागपूर: जिल्ह्यात अतवृष्टीमुळे रस्ते, पूल, शेती व अन्य झालेल्या नुकसानासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तातडीने पाठवावे. याबाबत आपण स्वत: पाठपुरावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २0२१ या महिन्यात पुरामुळे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झालेले पिकाखालील एकूण क्षेत्र हे ६२५0.0१ हेक्टर आर. असून ११ हजारावर शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

 

खरडून गेलेली शेती तसेच क्षतिग्रस्त झालेली घरे, खचलेले रस्ते-पुलांसाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांचा विभागनिहाय पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. पी. वर्मा, कार्यकारी अभियंता अनिल येरखेडे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, कार्यकारी अभियंता रोशन हटवार, राजेश ढुमणे यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २0२१ या महिन्यात पुरामुळे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झालेले पिकाखालील एकूण क्षेत्र हे ६२५0.0१हेक्टर आर. असून ११ हजारावर शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी तहसीलदार श्रीराम मुंदडा यांनी दिली.

 तर १ एप्रिल ते ३ ऑक्टोबर २0२१ दरम्यान, झालेल्या अतवृष्टीमुळे व पुरामुळे २१जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पात्र ४४ प्रकरणांपैकी ४0 प्रकरणांत मदत देण्यात आली आहे. तर एकूण १२५ लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडलीत. त्यांच्यासाठी प्राप्त २७ लक्ष अनुदानापैकी १४ लक्ष अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. तर आणखी १३.१५ लक्ष अनुदानाची गरज आहे. यासोबतच अन्य विभागनिहाय नुकसानाचे सादरीकरण करण्यात आले. मत्स्यव्यवसाय करणार्‍या संस्थाचे पुराच्या पाण्याने खूप नुकसान झाले. वेणा, कोलार, नांदागोमुख, उमरी, चंद्रभागा, मधुगंगा या जलाशयातील मासे, मासोळी व मत्स्यबोटुकलीचे साधारणत: २ कोटीच्या जवळपास नुकसान झाले आहे. मच्छिमार संस्थांचे मदत प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देशित केले. कडबी चौक उड्डाणपुलाच्या खाली उतरणार्‍या रॅम्प संदर्भात पुनर्पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिले.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.