Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
दापोरीतील शाळेचा दरवाजा उघडला, औक्षण करून चॉकलेट अन् मास्क देत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
05-Oct-2021, 1:45:56 pm
Edited by - Raghavendra Tokekar
दापोरीत कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्यामुळे शाळेतील किलबिलाट आता पुन्हा सुरू झाला आहे. (after 15 years city schools jr colleges to open on oct)
Abhijeet Bharat

मोर्शी : कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा तब्बल दीड वर्षांनंतर सुरु झाल्यामुळे शाळांची पहिली घंटा वाजली. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार आजपासून या विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्ताने राज्य सरकारने परिपत्रक काढून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

या पार्श्वभूमीवर दापोरी येथील जिल्हा शाळेमध्ये शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, केंद्र प्रमूख गजानन चौधरी यांनी जिल्हा परिषद शाळा दापोरी येथे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा अशा शुभेच्छा दिल्या.

दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये औक्षण करून गुलाबपुष्प, चॉकलेट, मास्क देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. राज्य शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता यांना प्राधान्य देत आज शाळेची पहिली घंटा वाजली. 

शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश होताच त्यांचे तापमान व ऑक्सिजन तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्यामुळे शाळेतील किलबिलाट पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृषाली अढाऊ, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, केंद्रप्रमुख गजानन चैधारी, वैशाली घोरपडे, दिनेश श्रीराव, रवींद्र भुक्ते, माधुरी घोंगडे, सरिता पाचघरे, संध्या दरोकर, पुष्पा आगरकर, यांच्यासह ग्रा.प. सदस्य शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.