Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
अखेर शाळांची घंटा वाजली! पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत
05-Oct-2021, 12:34:54 pm
Edited by - Pravin wankhede
कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळांची (Finally the school bell rang) घंटा सोमवारी वाजली. शाळेच्या पाहिल्या दिवशी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी काही शांळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली,
Abhijeet Bharat

नागपूर: कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळांची घंटा सोमवारी वाजली. शाळेच्या पाहिल्या दिवशी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही शांळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.

नागपुरात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी हनुमाननगर येथील लालबहादूर शास्त्री इंग्रजी शाळेत भेट दिली, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

याप्रसंगी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, लालबहादूर शास्त्री इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक संजय पुंड आदी उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान शिक्षण क्षेत्राचे तसेच विद्यार्थ्यांचे झाले आहे. मात्र या काळात त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मनपाच्या शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग घेतले. ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण शक्य नाही, अशा मुलांना त्याच्या घरी जाऊन शिकविण्यात आले. याचाच परिणाम असा की, यावर्षी मनपा शाळेतील पटसंख्या वाढली आहे. हे शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे, असे म्हणत महापौरांनी त्यांचे कौतुक केले. यावर्षी लालबहादूर शास्त्री इंग्रजी शाळेत वर्ग १ ते ४ मध्ये ७० विद्यार्थी आणि वर्ग ५ ते १० मध्ये ११५ विद्यार्थी वाढले असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.   

ते पुढे म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्यांचे नाते अतूट आहे. परस्पर संवादातून विद्यार्थी आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारून शंकांचे निरसन करू शकतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील कमतरता आता शिक्षकांनी भरून काढावी आणि दहावीचा शतप्रतिशत निकाल देण्यासाठी शिक्षकांनी योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले. तसेच महापौरांनी यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष चांगले जावे यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.  यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा सुरु झाल्याचा आनंद व्यक्त केला. संचालन शिक्षिका मधू तिवारी यांनी तर आभार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता येवले यांनी मानले.
 
दहावीच्या शंभर टक्के निकालाचे उद्दिष्ट : प्रा. दिलीप दिवे 
 शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, यावर्षी मनपा शाळेतील दहावीचे निकाल शंभर टक्के देण्याचे उद्दिष्ट आहे. याअनुषंगाने मनपाचे शिक्षण विभाग नियोजन करीत आहे, असे ते म्हणाले. तसेच मुंबई वगळता विद्यार्थ्यांना ई-टॅबलेट देणारी राज्यातील एकमेव नागपूर महानगरपालिका आहे. सोबतच इंटरनेटची व्यवस्था सुद्धा करून देत आहे. यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर पुरेपूर लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी केले.  

मुख्यमंत्र्यांनी साधला शिक्षकांशी संवाद

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण व आव्हानात्मक होते. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे आणि ती निश्चितपणे पार पडली जाईल, असा मला विश्वास आहे. एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.