Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
...म्हणून अहमदनगरच्या ६१ गावांमध्ये 10 दिवस lockdown
04-Oct-2021, 5:23:32 pm
Edited by - Pravin wankhede
आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील 61 गावांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत, आजपासून पुढील 10 दिवस लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत.
Abhijeet Bharat

अहमदनगर: आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील 61 गावांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत, आजपासून पुढील 10 दिवस लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. आजपासून जिल्ह्यातील 61 गावात कोरोना नियंत्रण करण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत.

कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी 61 गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. ग्रामस्थांनी मात्र लॉकडाऊनचे निकष बदलण्याची मागणी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये सर्वाधिक गाव हे संगमनेर तालुक्यातील आहे, संगमनेर तालुक्यातील 24 गावांचा यात समावेश आहे, लॉकडाउनमुळे या 61 गावात शाळा बंद राहणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये शाळा उघडण्यासाठी 13 ऑक्टोबर पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

व्यापाऱ्यांमध्ये रोष

अहमदनगर जिल्ह्यतील ६१ गावांमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊन बाबत व्यापारी वर्गात रोष दिसून येत आहे, लॉकडाऊनचे निकष लावताना लोकसंख्येचा विचार करण्यात यावा. अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.