Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
गोरेवाड्यातील वाघ,अस्वल जाणार दिल्लीला
03-Oct-2021, 3:26:08 pm
Edited by - Pravin wankhede
गोरेवाडा प्रकल्प नागपूर अंतर्गत येणाऱ्या वन्यप्राणी बचाव केंद्रातील दोन वाघीण व २ अस्वल हे आता थेट दिल्लीला जाणार आहे.
Abhijeet Bharat

नागपूर: गोरेवाडा प्रकल्प नागपूर अंतर्गत येणाऱ्या वन्यप्राणी बचाव केंद्रातील दोन वाघीण व २ अस्वल हे आता थेट दिल्लीला जाणार आहे. नवी दिल्ली येथील नॅशनल झूलॉजिकल पार्क येथे या प्राण्यांना स्थलांतरित करण्यात येत आहे. स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाली असून, गोरेवाड्यात असणाऱ्या प्राण्यांची संख्या पाहता प्राणी स्थलांतरित प्रक्रियेसाठी गोरेवाडा प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली आहे,

त्या अनुषंगाने नवी दिल्ली यांच्याकडून १६ सप्टेंबर ला या स्थलांतरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार हे प्राणी नॅशनल झूलॉजिकल पार्क येथे  स्थलांतरित करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित भवल यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे प्राणी वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्र गोरेवाड्याचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, उपसंचालक डॉ. व्ही. एम. धूत, विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई, सहायक वनसंरक्षक एच. व्ही. माडभूषी यांच्या मार्गदर्शनात वन्यप्राणी बचाव केंद्र येथे करून पाठविण्यात आले. या वन्यप्राण्यांच्या बदल्यात दिल्लीच्या नॅशनल झूलॉजिकल पार्ककडून गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला काळवीट, सांबर, भेकर आदी प्राणी आणण्यासाठी डॉ. मयूर पावशे, डॉ. सैय्यद बिलाल यांना पाठविण्यात आले आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.