Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
किंगखान शाहरुख चा मुलगा आर्यन NCB च्या तावडीत, नेमकं प्रकरण काय?
03-Oct-2021, 2:01:01 pm
Edited by - Pravin wankhede
सुपरस्टार अभिनेता शहारुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने तावडीत घेतले आहे. NCBने ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली आहे, या कारवाईत आर्यन खानला अटक करण्यात आली आहे.
Abhijeet Bharat

नागपूर: सुपरस्टार अभिनेता शहारुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने तावडीत घेतले आहे. NCBने ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली आहे, या कारवाईत आर्यन खानला अटक करण्यात आली आहे.

आर्यनसह १३ जणांना देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एकूण १३ जणांना केलेल्या अटकेत ३ महिलांचा देखील समावेश असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे. सध्या आर्यन खानसह इतरांची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

एनसीबीच्या मुंबई अधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझवर छापा टाकला. या छापेमारीत MDMA/ एक्स्टसी, कोकेन, MD (मेफेड्रोन) आणि चरस सारख्या विविध वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. ३ महिलांसह १० जणांवर अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या १० जणांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत आणले. आर्यन खानची सध्या एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान आर्यनने  ‘मला व्हिआयपी गेस्ट म्हणून पार्टीला बोलावण्यात आले होते. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलवण्यात आले’, असल्याचा खुलासा केला. यासंबंघीतील आज तकने वृत्त प्रकाशित केले आहे. या प्रकरणी कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझचे मालक आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या कंपनीच्या मालकांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.