Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
नितीन गडकरी यांचा रेडिओ ऑरेंज, अभिजीत भारत ला परीसस्पर्श
02-Oct-2021, 7:23:39 pm
Edited by - Pravin wankhede
स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असणारे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांचा रेडिओ ऑरेंज (Radio Orange) आणि अभिजीत भारत ( Abhijeet Bharat) ला परीसस्पर्श लाभला आहे. ज्या अर्थी परिस कुठ्याही वस्तू चे सोने करतो तसाच स्पर्श नितीन गडकरी यांचा रेडिओ ऑरेंज आणि अभिजीत भारत ला लाभला आहे.
Abhijeet Bharat

नागपूर: स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असणारे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा रेडिओ ऑरेंज आणि अभिजीत भारत ला परीसस्पर्श लाभला आहे. ज्या अर्थी परिस कुठ्याही वस्तू चे सोने करतो तसाच स्पर्श नितीन गडकरी यांचा रेडिओ ऑरेंज आणि अभिजीत भारत ला लाभला आहे. 'मी ज्या ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करतो, ते यशोशिखरावर पोहोचतातच असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले, ते  रेडिओ ऑरेंज च्या ३ से १३ का सफर आणि अभिजीत भारत च्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमात कांचन गडकरी, जे. के. मजुमदार, जयंती मजुमदार, रेडिओ ऑरेंजचे संचालक अभिजीत मजुमदार, मुख्य कार्यकारी अधिकारी इनू मजुमदार, यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अनोख्या अंदाजात उपस्थितांचे मागदर्शन केले. ते म्हणाले की, आजच्या अत्याधुनिक काळात सर्वच काही बदलत चालले आहे. लोक डिजिटल होत चालले आहेत. अशा या डिजिटल युगातही रेडिओ हे प्रभावी माध्यम आहे. तसेच आता अभिजीत भारत या ऑनलाइन न्यूज पोर्टल मुळे अनेकांना फायदा होईल. मी स्वतः टेक्नोसॅव्ही नाही परंतु, गेल्या काही काळात आधुनिक तंत्रज्ञानाला मी आत्मसात केले आहे. समाज माध्यमांवर असणाऱ्या माझ्या फॉलोवर्स ची संख्या एक कोटींच्या वर गेली असून युट्युब च्या माध्यमातून महिन्यांचे दोन ते तीन कोटी रुपये प्राप्त होत आहेत. सध्याच्या काळात डिजिटल माध्यम हे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या परिश्रमासह आई-वडिलांच्या आशीर्वादाची गरज असते. यात अभिजीत मजुमदार यांना आई-वडिलांचा आशीर्वाद लाभलेला आहे. म्हणुन ते आज यशोशिखरावर पोहोचले असल्याचे गडकरी म्हणाले.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.