Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
शाबास! चक्क या शेतकऱ्याने शेतात उभारले हवामान केंद्र
01-Oct-2021, 4:30:34 pm
Edited by - Pravin wankhede
भारतीय शेती ही हवामानावर अवलंबून असल्यामुळे ती सतत अस्थिर मानली जाते. बदलते हवामान यामुळे शेतीवर नेहमीच संकट असते. त्यामुळे हवामानाचा अंदाज (meteorological center) शेतकऱ्यांना काळाची गरज बनला आहे. शेतकरी सचिन संख (farmer sachin sankh) यांनी आपला शेतात स्वतःचे हवामान केंद्र उभारले आहे.
Abhijeet Bharat

सांगली: भारतीय शेती ही हवामानावर अवलंबून असल्यामुळे ती सतत अस्थिर मानली जाते. बदलते हवामान यामुळे शेतीवर नेहमीच संकट असते. त्यामुळे हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना काळाची गरज बनला आहे. या गरजेतून सांगली जिल्ह्यातील जत येथील प्रगतशील शेतकरी सचिन संख यांनी आपला शेतात स्वतःचे हवामान केंद्र उभारले आहे.

हवामानातील सतत होणारे बदल समजणे दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरू लागले आहे. या गरजेतूनच सांगली जिल्ह्यातील जत येथील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये हवामान केंद्राची उभारणी केली आहे. यामुळे ऊन, वारा, पावसाचे अंदाज घेऊन शेतीची नियोजन प्रगतीशील युवा शेतकरी सचिन संख करत आहेत. या केंद्राचा आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी नाही फायदा होत आहे. जत हा तसा अवर्षणग्रस्त भाग. सततच्या दुष्काळी स्थितीला तोंड देत शेती करायची आणि लहरी पावसामुळे हातातोंडाला आलेले पीक हातचे जायचे हे नेहमीचेच. बेभरवशाच्या नैसर्गिक वातावरणात शेती व्यवसायाला स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी संगणक अभियंता असलेल्या सचिन संख यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला.

सचिन संख यांची सुमारे ४५ एकर शेती आहे, ज्यामध्ये ते द्राक्ष आणि डाळींबाचे उत्पादन घेतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून ५५ हजार रुपयांमध्ये उभ्या राहिलेल्या या यंत्रणेद्वारे त्यांना आता शेत परिसरातील तापमान, वाऱ्यांचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आद्रता, द्राक्ष वेलींच्या पानांवर पडणारे दव, पानातून होत असलेले बाष्पीभवन, पर्जन्यमान याची अचूक माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे पिकाच्या वाढीपासून ते काढणीपर्यंतचे नेमके नियोजन करणे शक्य झाले आहे. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे अधिकचे नुकसान सचिन संख यांना आता टाळता येत आहे. याशिवाय या हवामानाच्या अंदाजाचा फायदा तीन ते चार किलोमीटर परिसरातील शेतकèयांना देखील होत आहे.  

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.