Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
मुंबईत आणखी एका संशयित दशतवाद्याला अटक
01-Oct-2021, 4:00:17 pm
Edited by - Pravin wankhede
दिल्ली पोलिसांनी भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा घाट उधळून लावला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान महाराष्ट्र एटीएसने मुंबईमधून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
Abhijeet Bharat

मुंबई: दिल्ली पोलिसांनी भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा घाट उधळून लावला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान महाराष्ट्र एटीएसने मुंबईमधून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर गुरुवारी पहाटे आणखी एकाला वांद्रे परिसरातून ताब्यात घेतले आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (५0) असे त्याचे नाव आहे. नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात त्याला चौकशीसाठी त्याला आणण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांना देशाच्या वेगवेगळ्या भागातून अटक केली. यातील जान मोहम्मद शेख याला मुंबईच्या धारावीमधून पकडण्यात आले. दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊन कारवाई करताच महाराष्ट्र एटीएस कामाला लागले. बेकायदेशीर तसेच देशविघातक कृत्याचा कट रचल्याचा संशयाखाली एटीएसने १८ सप्टेंबर रोजी जोगेश्‍वरी येथून झाकीर ते रिझवान याला १९ सप्टेंबरला मुंब्रा येथून अटक केली. या दोघांवर दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचाही आरोप आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या इशार्‍यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम याच्या सांगण्यावरून हे दोघे काम करीत होते.

पाकिस्तान मॉड्यूलचा घातपाताचा कट प्राथमिक स्थितीत असला तरी त्यासाठी असलेल्या स्लीपर सेलला शस्त्रे आणि स्फोटके पोहचविण्याची जबाबदारी या दोघांकडे सोपविण्यात येणार होती, अशी माहिती मिळत आहे. न्यायालयाने या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. मात्र मंगळवारी एटीएसने पुन्हा या दोघांचा ताबा घेतला. झाकीर आणि रिझवान यांच्या घरातून मिळालेले पुरावे आणि कॉल रेकॉर्ड यावरून आणखी काहीजण त्यांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले. या संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवून एटीएसने वांद्रे येथून इरफानला अटक केली. त्याच्या घरात काही आक्षेपार्ह साहित्य आढळले असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.