Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
महाविद्यालये दिवाळीनंतर उघडणार: उदय सामंत
01-Oct-2021, 3:44:42 pm
Edited by - Pravin wankhede
महाविद्यालये(Colleges) दिवाळीनंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटले आहे.
Abhijeet Bharat

मुंबई: राज्यातील शाळांची घंटा ४ ऑक्टोबरपासून वाजणार आहे. तर आता राज्यतील कॉलेज, महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री व टास्क फोर्सशी चर्चा करून कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलल्यास कॉलेज सुरू करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले आहे. राज्यातील कमी कोरोना प्रादुर्भाव असलेल्या जिलंमध्ये कॉलेज नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत विचार असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.


यावेळी बोलताना सामंत म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे. मात्र, पटसंख्या हाच महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी कशा पद्धतीचा फॉर्मुला तयार करायचा हय़ावर विचार करुनच कॉलेज सुरू करायची आहेत. १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करावीत असं यूजीसी आणि एआयसीटीईचे म्हणणे आहे. मात्र आपल्याकडे त्या काळात दिवाळीचा सण असल्याने त्या काळात महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. त्यानंतरच कदाचित कॉलेज सुरू करण्यात येईल. आम्ही त्या विचारात आहेत.


ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल. ज्याठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. याविषयी राज्य कृती दल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.