Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
world vegetarian day :दीर्घायुचा मंत्र 'सकस आहार'
01-Oct-2021, 12:23:58 pm
Edited by - Pravin wankhede
दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा केला जातो. १९७७ साली नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीने या दिवसाची संकल्पना आणली. त्यानंतर इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियनने १९७८ पासून या संकल्पनेस प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. तेव्हापासून हा दिन साजरा केला जात आहे.
Abhijeet Bharat

नागपूर:  आहार कोणी किती घ्यावा हे एक शास्त्र असून, माणसाची प्रकृती, वय, ऋतू इत्यादींवर ते अवलंबून असते. काय खावे आणि काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, आयुर्वेदानुसार शाकाहारच योग्य सांगितला आहे. शास्त्रीय मीमांसा वाचल्यास शाकाहारच उत्तम, योग्य आणि सर्वश्रेष्ठ सांगितला असून, आरोग्यपूर्ण, जीवनदायी आणि दीर्घायुष्य प्राप्त करून देणारा आहे, हे आपल्या लक्षात येईल. या क्षेत्रात जे संशोधन झालेले आहे, त्याचा विचार केल्यास असे दिसते की शाकाहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे, क्षार हे अधिक असतात.

अपाच्य (पचणार नाहीत असे) घटक आणि चरबी नसते. शाकाहार सुपाच्य असल्याने पचनेंद्रियांवर कमीत कमी ताण पडतो आणि त्यामुळे इंद्रिये अनेक वर्षे सक्षम राहतात. याशिवाय शाकाहारी अन्नघटकांचे शोषण आणि अभिसरण जलद होते. शाकाहाराने अवाजवी वजन वाढण्याची शक्यता कमी असते.

 

Abhijeet Bharat

जागतिक शाकाहार दिन
शाकाहाराचे महत्त्व आणि त्याची महती सर्वांना कळावी, तसेच  त्याबाबत समाजात जागृती करण्यासाठी दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा केला जातो. १९७७ साली नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीने या दिवसाची संकल्पना आणली. त्यानंतर इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियनने १९७८ पासून या संकल्पनेस प्रोत्साहन आणि पाqठबा दिला. तेव्हापासून हा दिन साजरा केला जात आहे.
१ ऑक्टोबरपासून महिनाभर शाकाहाराविषयी जागृती करणारी मोहीम राबविली जाते. सर्वसामान्य लोकांना शाकाहाराच्या फायद्यांविषयी माहिती दिली जाते. शाकाहारी आहारामुळे होणारे आरोग्याचे फायदे सिद्ध झालेले आहेत. प्राणी आणि पृथ्वी वाचविण्यासाठी शाकाहारी व्हा, असा संदेश या चळवळीचे कार्यकर्ते देतात. यामुळे हृदयरोग, मस्तिष्काघात आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. धान्य आणि इतर पिकांच्या अधिक कार्यक्षम वापराद्वारे जगातील भुकेल्यांना अन्न देण्यास एक व्यावहारिक उत्तर देण्याचा प्रयत्न या शाकाहार दिनाच्या माध्यमातून होतो. कत्तलखान्यांत जाण्यापासून प्राण्यांना तसेच पीडित जनावरांना वाचवा, असा संदेश या दिनाच्या माध्यमातून देण्यात येतो.

शाकाहारात मांसाहारापेक्षा अधिक ऊर्जा
१०० ग्रॅम मांसात ११८ कॅलरीज, १०० ग्रॅमबीन्समध्ये १५८ कॅलरीज असतात. १०० ग्रॅम सर्व कडधान्यात २०० कॅलरीज, १०० ग्रॅम सर्व प्रकारच्या सुक्या मेव्यात ४०० कॅलरीज असतात. यावरून असे म्हणता येईल की शाकाहारी पदार्थांत ऊर्जाशक्ती ही मांसाहारी पदार्थांपेक्षा जास्त असते. परंतु, ते पचण्यासाठी शरीरातील खर्च होणारी ऊर्जा मात्र मांसाहाराच्या पचनास लागणाèया ऊर्जेपेक्षा कमी लागते तसेच दोन्ही आहाराच्या किमतीत खूप फरक असतो.

मांसाहारी पदार्थांतून प्रथिने (प्रोटीन्स), कॅल्शियम, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात मिळत असले, तरी ते भरपूर मसाले आणि तेल वापरून बनवले जातात. त्यामुळे शरीरातील चरबी वाढून जडत्व qकवा स्थूलत्व येऊ शकते. मांसाहारामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढून उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारखे विकार होऊ शकतात. या व इतर कारणांमुळे अनेकजण आता मांसाहार टाळून शाकाहाराकडे वळत आहेत.मांसाहाराचे तोटे मांसाहार हा पचनास जड असतो. यामुळे जठरातील आम्लता वाढून हायपर अ‍ॅसिडिटी, जीईआरडी इत्यादी विकार होऊ शकतात तसेच मलावरोध, मूळव्याध, फिशरचे प्रमाण वाढते. मांसाहारी पदार्थांमध्ये अराचोनिक नावाचे आम्ल आढळल्याने विचारशक्तीवर परिणाम होतो, असेकाही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.