Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
IPL: MI ने साधला विजयाचा नेम पंजाब किंग्सचा केला पराभव
30-Sep-2021, 1:32:17 pm
Edited by - Pravin wankhede
IPL मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात अबुधाबी येथे सामना खेळण्यात आला. मुंबईने नाणेफेक जिंकून सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पंजाबने २० षटकात ६ बाद १३५ धावा केल्या. तर मुंबईने पंजाबवर सहा गडी राखून मात केली आहे.
Abhijeet Bharat

अबुधाबी: IPL मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात अबुधाबी येथे सामना खेळण्यात आला. मुंबईने नाणेफेक जिंकून सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पंजाबने २० षटकात ६ बाद १३५ धावा केल्या. तर मुंबईने पंजाबवर सहा गडी राखून मात केली आहे. हार्दिक पंड्याची शेवटच्या षतकांत केलेली फटकेबाजी आणि सौरभ तिवारीने दिलेली साथ यामुळे पंजाबपासून विजय खेचून आणता आला. पंजाबकडून मार्करम याने यात सर्वाधिक ४२ धावांचे योगदान दिले. तर मुंबईकडून बुमराह आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा के एल राहुल सोबत मनदीस सिंग सलामीला आला. दोघांनी सावध सुरूवात केली. परंतु सहाव्या षटकात कृणाला पंड्याने मनदीप सिंगला पायचित करत पंजाब किंग्सला पहिला धक्का दिला. त्याने १५ धावांची खेळी केली. यानंतर केरॉन पोलार्डने सातव्या षटकात पंजाबला दोन जबर धक्के दिले. त्याने प्रथम ख्रिस गेलला (१) हार्दिक पंड्याकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर त्याने के एल राहुलची शिकार केली. 

राहुलचा झेल जसप्रीत बुमराहने घेतला. राहुलने २१ धावांचे योगदान दिले. राहुल बाद झाल्यानंतर निकोलस पूरनला बुमराहने पायचित करत पंजाबला बॅकफूटवर ढकलले. ७.३ षटकात पंजाबची अवस्था ४ बाद ४८ अशी झाली. तेव्हा एडने मार्करम आणि दीपक हुड्डा जोडीने पंजाबच्या डावाला आकार दिला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी रचली. दीपक चहरने मार्करमला क्लीन बोल्ड करत ही जोडी फोडली. मार्करमने २९ चेंडूत ६ चौकारांसह ४२ धावांची खेळी केली. हाणामारीच्या षटकात दीपक हुड्डा जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २८ धावांची खेळी केली. अखेरीस पंजाबला १३५ धावांपयर्ंत मजल मारता आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि केरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. कृणाल आणि चहरला प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.