Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
दिलासादायक! तब्बल १६ महिन्यांनी शहरात कोरोनाचा शून्य रुग्ण
30-Sep-2021, 12:38:01 pm
Edited by - Pravin wankhede
मागील अनेक महिन्यांनंतर नागपूर शहरातून दिलासादायक माहिती पुढे आली. मंगळवारी २८ सप्टेंबरला कोरोना चाचणी केलेल्या एकाही रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला नसल्याची माहिती आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली. 
Abhijeet Bharat

नागपूर:  मागील अनेक महिन्यांनंतर नागपूर शहरातून दिलासादायक माहिती पुढे आली. मंगळवारी २८ सप्टेंबरला कोरोना चाचणी केलेल्या एकाही रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला नसल्याची माहिती आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली.

शहरात ३२९८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी सर्वांचे अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्याने मंगळवार शहरात कोरोनाच्या शून्य बाधितांचा दिवस ठरला आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांचे प्रयत्न आणि नागरिकांचा समंजसपणा यामुळेच हे शक्य झाले असून याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिक, डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  अभिनंदन केले आहे. १६ मे २०२० नंतर पहिल्यांदाच नागपूरात एकही रुग्ण कोरोना चाचणी दरम्यान आढळलेला नाही.

मंगळवारी प्राप्त अहवाल आणि मागील महिनाभरापासून मनपाकडे प्राप्त होणाऱ्या कोरोना अहवालावरून शहरामध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाला असल्याचे दिसून येत असले तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी आता लसीकरण हे शस्त्र उपलब्ध आहे. शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे शहरातील १५५ पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

लसीकरणाचा प्रभाव आज दिसून येत असून त्यामुळे संसर्गाचा धोका काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घ्याव्यात. याशिवाय लसीकरणानंतरही पूर्वीप्रमाणेच कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे पालन सार्वजनिक ठिकाणी वावरताना करावे. मुखाच्छादन, निर्जंतुकीकरण द्रवाचा वापर आणि भौतिक दुरत्वाचे पालन अवश्य करावे, असे आवाहनही महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.