Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
पुरामुळे मराठवाड्याचे मोठे नुकसान, ३५ जणांचा बळी तर ४ हजार जनावरे गेली वाहून
29-Sep-2021, 3:17:15 pm
Edited by - Pravin wankhede
मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत ३५ जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास ४ हजार जनावरे वाहून गेली आहेत.
Abhijeet Bharat

औरंगाबाद: मराठवाड्यात अतवृष्टी सुरू असून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळे लोकांनी दोन दिवस सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक असल्यास लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व जिल्हाधिकार्‍यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत ३५ जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास ४ हजार जनावरे वाहून गेली आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री यांनी मराठवाड्यात आतापर्यंत २0 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दिली आहे. मराठवाड्यात पावसामुळे दाणादाण उडाली आहे. उस्मानाबादमध्ये मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह नदी-नाले ओसंडून वाहतायत. पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. बीडमधल्या केज, अंबेजोगाई, माजलगाव तालुक्यात पाऊस बरसला.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. परंतु आता निवाळलेले हे वादळ दोन-तीन दिवसात पुन्हा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नव्याने निर्माण होणारे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होणार असून त्याचे नाव शाहीन असणार आहे. शाहीन हे नाव कतारकडून देण्यात आलेले आहे. भारतावर याचा प्रभाव नसणार आहे आणि चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकणार आहे.

गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. पश्‍चिम विदर्भावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगावसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.