Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
IPL: सनरायझर्स हैदराबादच्या विजयाने बिघडले प्लेऑफचे गणित
28-Sep-2021, 10:15:57 am
Edited by - Pravin wankhede
डेव्हिड वॉर्नरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेसन रॉयने अर्धशतक  झळकवून सनरायजर्स हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. हैदराबादने IPL २०२१मधील दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि राजस्थानच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्यावर पाणी फेरले.
Abhijeet Bharat

 

अबु धाबी: सनरायझर्स हैदराबाद संघाने सोमवारी येथे झालेल्या सामन्यात चांगली कामगिरी करीत राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. डेव्हिड वॉर्नरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेसन रॉयने अर्धशतक  झळकवून सनरायजर्स हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. त्याच्या  खेळीने संजू सॅमसनच्या ८२ धावा व्यर्थ गेल्या. हैदराबादने आयपीएल २०२१ मधील दुसèया विजयाची नोंद केली आणि राजस्थानच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्यावर पाणी फेरले.

राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकून अव्वल चारमध्ये प्रवेश केला असता. परंतु आता गणित बिघडले आहे. संजू सॅमसनने सलग दुसèया सामन्यात अर्धशतकी खेळी केली आणि आजच्या सामन्यात तर त्याने सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सॅमसन ५७ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. राजस्थानने ५ बाद १६४ धावा केल्या. लोम्रोरने २९ धावा केल्या. अखेरच्या तीन षटकांत राजस्थान रॉयल्सला केवळ १८ धावाच करता आल्या. डेव्हिड वॉर्नरचे नसणे ही सामन्यातील चर्चेची गोष्ट ठरली. त्याच्या जागी सनरायजर्स हैदराबादकडून जेसन रॉयने पदार्पण केले. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सचा एव्हिन लुईस दुसèया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले. त्यानंतर यशस्वी जयस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी संयमी खेळी केली.

राजस्थानने ७ षटकांत १ बाद ५७ धावा केल्या होत्या. जयस्वालने २३ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. लिएम लिव्हिंगस्टोन (४) अपयशी ठरला. सिद्धार्थ कौलने २० व्या षटकात दोन गडी बाद करीत सनरायजर्स हैदराबादला सामन्यात परत  आणले. प्रत्युत्तरात वृद्धिमान सहा व पदार्पणवीर जेसन रॉय यांनी पहिल्या गड्यासाठी १० च्या सरासरीने ५७ धावा केल्या. महिपाल लोम्रोरने राजस्थान रॉयल्सला पहिले यश मिळवून दिले. सहा १८ धावांवर यष्टिचित झाला. जेसन रॉय व केन विलियम्सन ही जोडी सनरायजर्स हैदराबादची धावगती कायम ठेवत खेळत होती.े त्यामुळे राजस्थान रॉयल्सवरील दडपण वाढत गेले. जेसन रॉयने ३६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

यशस्वी जयस्वालने त्याचा झेल सोडला. पण नंतरच्या षटकात रॉयला सॅमसनच्या हाती झेलबाद करण्यात आले. रॉयने ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. मुस्ताफिजूर  रहमानने सनरायजर्स हैदराबादच्या प्रियाम गर्गला शून्यावर बाद केले. पण केन संयमी खेळ करून राजस्थान रॉयल्सच्या पराभवाकडे नेत होता.अखेरच्या पाच षटकांत सनरायजर्स हैदराबादला ३४  धावा करायच्या होत्या. अभिषेक वर्माने केनला उत्तम साथ देत सनरायजर्स हैदराबादला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. शर्माने १६ चेंडूंमध्ये नाबाद २१ धावा केल्या, तर केनने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. हैदराबादने ९ चेंडू व ७ गडी राखून हा सामना qजकला 

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.