Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
पर्यटकच आपला एम्बेसिडर झाला पाहिजे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
27-Sep-2021, 10:49:10 pm
Edited by - Pravin wankhede
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पर्यटन विभागाला पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यावर भर देण्याची सूचना केली आहे. राज्यात ८०० लेण्या, गड किल्ले, सह्याद्री पर्वत रांग असे अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी पोहचण्याची आणि राहण्याची उत्तम सोय झाल्यास परदेशातून येणारा पर्यटकच आपला एम्बेसिडर झाला पाहिजे अशी सुविधा निर्माण करा.
Abhijeet Bharat

मुंबई: जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पर्यटन विभागाला पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यावर भर देण्याची सूचना केली आहे. राज्यात ८०० लेण्या, गड किल्ले, सह्याद्री पर्वत रांग असे अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी पोहचण्याची आणि राहण्याची उत्तम सोय झाल्यास परदेशातून येणारा पर्यटकच आपला एम्बेसिडर झाला पाहिजे अशी सुविधा निर्माण करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील पर्यटनाविषयी माहिती देण्यासाठी आपल्याला ब्रँड एम्बेसेडरची गरज भासते परंतु उत्तम सुविधा करुन येणारा पर्यटकच आपला एम्बेसेडर कसा होईल यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटान दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमात म्हटलं आहे की, येणारा पर्यटक पहिल्यांदा येताना येऊ कसा? त्याच्यासाठी आपण अँप तयार केलेले आहेत. तसेच जाऊ कसा यासाठी देखील सुविधा केल्या आहेत. पण गेल्यानंतर राहणार कुठे त्या सुविधा कशा असतील? येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी आपण दर्जेदार सुविधा केल्या आहेत. मी तर म्हणेन आपल्याला दुसरा ब्रँड अम्बेसिडर नेमण्याची गरज नाही. येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड अम्बेसिडर असला पाहिजे. कारण ती आपली संस्कृती आहे. अतिथी देवो भवं, त्या दृष्टीने जर त्याला सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर तो परदेशात जाऊन सांगेल, अरे तु महाराष्ट्रात जा आणि महाराष्ट्रात गेल्यावर अमूक ठिकाणी जा, तु तिकडे पोहचल्यावर राहण्याची सुविधा देखील उत्तम आहे. या अशा गोष्टींच्या दिशेना आपण प्रवास करत आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्री म्हणजे नुसतं उपमुख्यमंत्री म्हणून बोले असता तर अर्थ नसता तर अर्थमंत्र्यांनी बोललंय म्हणून त्याला अर्थ आहे. असे वक्तव्य देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण विभागाला निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला आहे. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य टोला लगावला आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.