Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
IPL: सनराईजर्स हैदराबादच्या टी. नटराजनला कोरोनाची लागण
22-Sep-2021, 5:00:34 pm
Edited by - Pravin wankhede
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १४ व्या हंगामात पुन्हा एका खेळाडूला कोरोनाची लागण (corona infection) झाली आहे. आधीच कोरोना संसर्गामुळे IPL चे सामने स्थगित करावे लागले होते. त्यानंतर गेल्या रविवारपासून पुनःश्च IPL हंगामाला देशाबाहेर UAE मध्ये सुरुवात झाली आहे. आता या स्पर्धेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.(Sunrisers Hyderabads T. Natarajan)
Abhijeet Bharat

दुबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामात पुन्हा एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. आधीच कोरोना संसर्गामुळे IPL चे सामने स्थगित करावे लागले होते. त्यानंतर गेल्या रविवारपासून पुनःश्च IPL हंगामाला देशाबाहेर UAE मध्ये सुरुवात झाली आहे. आता या स्पर्धेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. स्पर्धेत पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. सनराईजर्स हैदराबादचा खेळाडू टी. नटराजनला कोरोनाची लागण झाली आहे.

IPL प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, टी. नटराजनच्या RT-PCR चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर नटराजनने तात्काळ स्वतःला आयसोलेट केलं असून, त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं (asymptomatic) दिसून येत नाहीयेत. खबरदारीचा उपाय म्हणून नटराजनच्या संपर्कात आलेल्या संघातील सहा व्यक्तींनाही क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यात ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर, टीम व्यवस्थापक विजय कुमार, फिजीओथेरपिस्ट श्याम सुंदर जे., डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टीक व्यवस्थापक तुषार खेडकर, नेट बॉलर पेरियसामी गणेशन हे टी. नटराजन यांच्या संपर्कात आले आहेत.  IPL मध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली यांच्यात सामना रंगणार होता. परंतू नटराजनचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यामुळे तात्काळ सर्व संघातील सदस्यांच्या RTPCR टेस्ट करण्यात आल्या. ज्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे आजचा दिल्लीविरुद्धचा सामना निजोयित वेळेत खेळवला जाणार आहे असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.