Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
कामाचा ताण अन् अवेळी ड्युटीच्या टेन्शनमधून महिला पोलिसांना मिळणार मुक्ती
22-Sep-2021, 2:32:16 pm
Edited by - Pravin wankhede
महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीच्या वेळेत 4 तासांची कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र पोलिसांनी घेतलाय. अर्थात ड्यूटीची वेळ आता 8 तासांची राहणार असून, शासकीय कर्तव्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्वागत केले आहे.  
Abhijeet Bharat

अमरावती : वेळीअवेळी ड्युटी लागण्याचे टेन्शन आणि कामाचा ताण कायमच महिला पोलीस सहन करतात. अनेकांना कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करत सेवेत रुजू व्हावे लागते. मात्र आता या टेन्शनमधून महिला पोलिसांची मुक्ती होणार आहे. कारण महिला पोलिसांच्या ड्युटीच्या वेळेत ४ तासांची कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र पोलीस दलाने आहे.

महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षिततेसह त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याने स्वागत असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीसाठी महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. महिलांची सुरक्षितता जोपासण्यासह शासन कटिबद्ध असल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

प्रत्येक घटकाची काळजी घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविणे व सर्वांना सोबत घेऊन राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महिला कर्मचा-यांना निकोप, सुरक्षित वातावरणात काम करता यावे. त्यांना शासकीय कर्तव्याबरोबरच इतर जबाबदा-याही पार पाडता याव्यात यासाठी विविध क्षेत्रांत व विविध स्तरांवर महत्वपूर्ण निर्णय होत आहेत. त्यानुसार महिला पोलीस कर्मचा-यांवरील विविध जबाबदा-या पाहता ड्युटीच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय या महिलाभगिनींना दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केला.  

पोलीसांवरील जबाबदा-या, कामांचा व्याप पाहता ड्युटीचे तास मर्यादित असण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्याची गरज ओळखून महाविकास आघाडी शासनाने महिला पोलीस कर्मचा-यांची ड्युटी 8 तास करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीही याबाबत पुणे, नागपूरसारख्या महानगरांतही या निर्णयाची अंमलबजावणी होण्याबाबत आदेशित केले आहे. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत महिला कर्मचा-यांसाठी 8 तास ड्यूटीचा आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी निर्मगित केला, तसेच जिल्ह्यांतर्गत पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनीही तसा आदेश निर्मगित केला आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.