Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
चेन्नई सुपरकिंग्स विजयासह पोहोचले नंबर वन वर
20-Sep-2021, 12:57:18 pm
Edited by - Pravin wankhede
इंडियन प्रीमियत लीगचे (IPL) उर्वरित सामने रविवार १९ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे.  याचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) असा खेळण्यात आला या सामन्यात चेन्नई ने २० धावांनी विजय मिळविला, या सामान्य नंतर बारा पॉइंटसह चेन्नई पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहे.
Abhijeet Bharat

दुबईः इंडियन प्रीमियत लीगचे (IPL) उर्वरित सामने रविवार १९ सप्टेंबरपासून सुरू  झाले आहे.  याचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा खेळण्यात आला या सामन्यात चेन्नई ने २० धावांनी विजय मिळविला, या सामान्य नंतर बारा पॉइंटसह चेन्नई पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईने फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारित २० ओव्हरमध्ये ६ बाद १५६ धावा केल्या, तर मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ बाद १३६ धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा केल्या. यात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. रविंद्र जडेजाने २६, ड्वेन ब्राव्होने २३, सुरेश रैनाने ४, एम एस धोनीने ३, शार्दुल ठाकूरने नाबाद १ धाव अशी कामगिरी केली. फाफ डू प्लेसिस आणि मोईन अली हे दोघे शून्यावर बाद झाले तर अंबाती रायुडू शून्य धावा करुन दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. तो पुन्हा फलंदाजीसाठी आला नाही. मुंबईकडून  मिल्ने, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

मुंबई इंडियन्सकडून सौरभ तिवारीने नाबाद ५० धावा केल्या. याआधी सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉकने १७ आणि अनमोलप्रीत सिंहने १६ धावा केल्या. सुर्यकुमार यादवने ३, ईशान किशनने ११, कायरन पोलार्डने १५ धावा केल्या. धावचीत झालेल्या कृणाल पांड्याने चार धावा केल्या. अॅडम मिल्नेने १५ धावा केल्या. राहुल चाहरने शून्य धावा केल्या. बुमराह एक धाव करुन नाबाद राहिला. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने तीन तर दीपक चहरने दोन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी एक विकेट घेतली.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.