Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
पीरियड्सशी संबंधित 'या' अफवांवर आजही विश्वास ठेवतात लोकं, काय आहे सत्य? जाणून घ्या
14-Sep-2021, 7:02:51 pm
Edited by - Smruti Chobitkar
आजही बऱ्याच स्त्रिया (Women) मासिक पाळीविषयी (Periods) खुलेपणाने चर्चा करण्यास टाळाटाळ करतात. इतर आरोग्य समस्यांप्रमाणे मुलींना मासिक पाळीविषयीही मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये याबाबतचा गोंधळ आणि संभ्रम (Rumors) निर्माण होणार नाही. (people still believe in rumors related to periods know what is the truth)
Abhijeet Bharat

नागपूर : आजही बऱ्याच स्त्रिया (Women) मासिक पाळीविषयी (Periods) खुलेपणाने चर्चा करण्यास टाळाटाळ करतात. काही ठिकाणी मासिक पाळी अपवित्र मानली जाते. पीरियड्सबद्दल लोकांना जास्त माहिती नसल्यामुळे यासंदर्भात त्यांच्या मनात अनेकप्रकरणे समज आहेत. त्यामुळे याविषयी योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. 

इतर आरोग्य समस्यांप्रमाणे मुलींना मासिक पाळीविषयीही मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये याबाबतचा गोंधळ आणि संभ्रम निर्माण होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया पिरियड्सशी संबंधित काही धारणा ज्यांचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. शतकांपासून या गोष्टी मानल्या जात असल्यामुळे लोकं आजही या धारणांवर विश्वास ठेवत आहेत. 

पिरियड्सचे रक्त हे खराब (Impure) रक्त नाही : असे मानले जाते की मासिक पाळीचे रक्त खराब असते. परंतु, या रक्ताला खराब म्हणता येणार नाही. यात कोणत्याही प्रकारचे टॉक्सिन्स नसतात. या रक्तात गर्भाशयाचे टिशू, म्युकस लायनिंग आणि बॅक्टेरिया राहत असून याला प्रदूषित किंवा खराब म्हणता येणार नाही. ही एक शारीरिक प्रक्रिया आहे. याबद्दल कोणालाही लाज वाटू नये.

पिरियड्स चार दिवस असले पाहिजे : प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीचे चक्र वेगळे असते. ते पूर्णपणे तिच्या शरीरावर अवलंबून असते. सामान्य चक्राचा कालावधी २ ते ८ दिवसांपर्यंत असतो. तुमचे चक्र २ दिवसांपेक्षा कमी किंवा ८ दिवसांपेक्षा जास्त असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पिरियड्स दरम्यान आंबट गोष्टी खाऊ नका : काही स्त्रिया मासिक पाळीदरम्यान आंबट पदार्थ खाणे टाळतात. परंतु, तुम्ही मासिक पाळीच्या वेळी अंबड पदार्थ खाऊ शकत नाही, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. मासिक पाळी दरम्यान महिलांनी निरोगी आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. मासिक पाळीशी संबंधित समस्या टाळण्यासाठी महिलांनी जंक फूड खाणे टाळले पाहिजे.

पिरियड्समध्ये आंघोळ करू नये : मासिक पाळीचा आंघोळ करणे, डोके धुणे आणि मेक-अपकरण्यासही कोणताही संबंध नाही. तर नियमित आंघोळ करणे आणि स्वच्छता बाळगल्याने इन्फेक्शनचा धोका कमी असतो.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

    

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.