Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
Hindi Diwas 2021: स्वातंत्र्यानंतर हिंदी अशी बनली भारताची राजभाषा, असा आहे इतिहास
14-Sep-2021, 5:09:06 pm
Edited by - Smruti Chobitkar
Hindi Diwas 2021 : दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस (Hindi Diwas) साजरा केला जातो. इंग्रजी, स्पॅनिश आणि मंदारिननंतर हिंदी (Hindi) ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. स्वातंत्र्यानंतर (after Independence) हिंदी भारताची (India) राजभाषा (Official Language) कशी बनली हे आज आपण जाणून घेऊया... (hindi diwas 2021 after independence hindi became official language of india know history)
Abhijeet Bharat

नागपूर : हिंदीला १४ सप्टेंबर १९४९ रोजी राजभाषेचा दर्जा मिळाला. तेव्हापासून दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेऊला काय आहे या दिवसाचा इतिहास...

दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. इंग्रजी, स्पॅनिश आणि मंदारिननंतर हिंदी ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. दरवर्षी हिंदी दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती राजभाषा पुरस्काराने लोकांना भाषेच्या योगदानाबद्दल सन्मानित करतात.

भारतातील हिंदी भाषेचा इतिहास इंडो-युरोपियन भाषा घराण्याच्या इंडो-आर्यन शाखेचा आहे. जी भारतातील अधिकृत भाषांपैकी एक म्हणून देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न भाषेचाच उपस्थिती झाला होता. भारतात शेकडो भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात, हे आपण सर्वजण जाणतोच. अशा स्थितीत भारताची अधिकृत भाषा (राजभाषा) म्हणून एक भाषा निवडणे हे आपल्या संविधानाच्या रचनाकारांसाठी मोठे आव्हान होते.

Abhijeet Bharat

 

प्रथम हिंदी आणि इंग्रजीला निवडण्यात आले

६ डिसेंबर १९४४६ रोजी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाच्या अंतिम मसुद्याला संविधान सभेने मंजुरी दिली. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून स्वतंत्र भारताचे स्वतःचे संविधान देशभरात लागू झाले. परंतु, त्यावेळीही राजभाषा म्हणून कोणती भाषा निवडावी हा एक मोठा प्रश्न होता. त्यानंतर बराच विचार करण्यात आला आणि नंतर हिंदी आणि इंग्रजी ही नवीन राष्ट्राची भाषा म्हणून निवडली गेली. 

संविधान सभेने देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ब्रिटिशांबरोबर राष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली. परंतु, त्यानंतर १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने एकमताने निर्णय घेतला की हिंदी ही भारताची अधिकृत भाषा (राजभाषा) असेल. भारतीय संविधानाच्या भाग १७ च्या अध्यायातील कलम ३४३ (१) मध्ये असे म्हटले आहे की 'संघाची अधिकृत भाषा हिंदी आणि लिपी देवनागरी असेल.'

दरम्यान, १९१८ मध्ये हिंदी साहित्य संमेलनात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्यासाठी पुढाकार घेतला होता. महात्मा गांधींनीही हिंदीला जनतेची भाषा म्हणून वर्णन केले होते. जेव्हा देशाची अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषा निवडली गेली, तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी १४ सप्टेंबर हा 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला पाहिजे. भारतात पहिला हिंदी दिवस १४ सप्टेंबर १९५३ रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस साजरा केला जात आहे.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

  

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.