ठाणे : सततच्या बलात्काराच्या घटनांमुळे महाराष्ट्र पूर्णपणे हादरून गेले आहे. मुंबईतील साकीनाका येथील एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या तिच्या वेदनादायक मृत्यूची घटना ताजी असतानाच उल्हासनगरात बलात्काराची आणखी एक अमानुष घटना घडली आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानाजवळ शुक्रवारी एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. हातोड्याचा धाक दाखवून आरोपीने मुलीवर बलात्कार असल्याचे समोर आले. पोलिसांनी रविवारी या घटनेबाबत माहिती दिली.
कल्याण रेल्वे पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचे वय ३५ वर्षे असून त्याला शनिवारी अटक करण्यात आली. १४ वर्षीय मुलगी शिर्डीला आपल्या आईला भेटून परत येत होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास ती बसने कल्याणपर्यंत आली. त्यानंतर ती लोकलने कल्याणहून उल्हासनगर स्थानकावर पोहोचली. उल्हासनगर परिसरात ती आपल्या आजीसोबत राहत असल्याने घरी जाण्यासाठी ओव्हरहेड वॉकवे (स्कायवॉक) वरून जात असताना तिला तिचे काही मित्र भेटले.
Maharashtra | Man arrested for allegedly raping a 14-year-old minor girl in Ulhasnagar railway station premises. Case registered under relevant sections of Indian Penal Code and POCSO Act
— ANI (@ANI) September 12, 2021
अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीकांत गायकवाड नावाच्या तरुणाने हातोडीचा धाक दाखवत मुलीच्या मित्रांना पळवून लावले आणि तिला बळजबरीने स्थानकाच्या बाजूला असलेल्या वस्तीतील एका खोलीत नेले. पीडित मुलीने विरोध केला. मात्र, त्याने तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. विरोधादरम्यान ही दुखापत झाल्याची शकता आहे. सध्या तिच्यावर उल्हासनगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पीडित आणि तिचे नातेवाईक प्रथम उल्हासनगर शहरातील पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यासाठी गेले. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना रेल्वे पोलिसांकडे जाण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शनिवारी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपीला शोधून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.