Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
बुमराहने मोडला कपिलदेव यांचा विक्रम, भारतचा ऐतिकासिक विजय
07-Sep-2021, 2:57:39 pm
Edited by - Pravin wankhede
गोलंदाज जसप्रीत  बुमराहने भारताचे माजी कर्णधार कपिलदेव  यांचा विक्रम मोडला. जसप्रीत  बुमराहने कसोटीत १०० गडी बाद करण्याचा विक्रम केला. त्याने २४  डावांमध्ये १०० गडी बाद करीत कपिल देव यांचा (२५ डाव) विक्रम मोडला.
Abhijeet Bharat

इंग्लंड: गोलंदाज जसप्रीत  बुमराहने भारताचे माजी कर्णधार कपिलदेव  यांचा विक्रम मोडला. जसप्रीत  बुमराहने कसोटीत १०० गडी बाद करण्याचा विक्रम केला. त्याने २४  डावांमध्ये १०० गडी बाद करीत कपिल देव यांचा (२५ डाव) विक्रम मोडला. कपिल देव यांनी १९८०मध्ये हा विक्रम केला होता. इरफान पठाणनने २००८ मध्ये २८ डावांमध्ये व मोहम्मद शमीने २०१८ मध्ये २९ डावांमध्ये १०० कसोटी गडी बाद करण्याचा विक्रम केला होता.

इंग्लंडविरुद्ध येथे खेळल्या गेलेली चौथी कसोटी भारताने १५७ धावांनी जिंकून मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. भारताने पहिले फलंदाजी करीत पहिल्या डावात १९१ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने २९० धावा केल्या. दुसèया डावात रोहित शर्माच्या शतकाच्या मदतीने भारताने ४६६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु इंग्लंडचा संघ २१० धावांमध्येच गारद झाला. इंग्लंड संघ मालिकेत १- २ ने माघारला आहे. ५० वर्षांनंतर मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा होत आहे. पाचव्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. इंग्लंडच्या फलंदाजांना एकामागून एक बाद करीत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यामुळेच भारतीय संघाला विजय प्राप्त करता आला. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासून भारताने इंग्लंडच्या फलंदाजांना ठराविक फरकाने बाद करण्याचा सपाटा लावला होता.

इंग्लंडचा रॉरी बन्र्स (५०) हा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने डेव्हिड मलानला धावचित करीत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीदचा सोपा झेल टिपण्यात सिराजला अपयश आले. त्यावेळी हसीब हा ५५ धावांवर खेळत होता. पण त्यानंतर जडेजानेच हसीबला बाद करीत भारताला मोठे यश मिळवून दिले. हसीबने सहा चौकारांच्या जोरावर ६३ धावा केल्या. हसीब बाद झाल्यावर ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली हे लवकर बाद झाले.

भारताने यावेळी सहा धावांत चार फलंदाजांना बाद केल्यामुळे संघाच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. भारताच्या विजयाच्या मार्गात अडसर होता इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचा. कारण यापूर्वी झालेल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये रूटने शतक झळकवले होते. पण शार्दुल ठाकूरने रूटला बाद करीत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ख्रिस वोक्सला १८ धावांवर बाद केले आणि भारतीय संघ विजयाच्या आणखी जवळ गेला.

या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. कारण पहिल्या डावातही वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा केला होता. त्याचबरोबर दुसèया डावातही उमेश यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी उत्तम कामगिरी केली. या चौघांना रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. शार्दुल ठाकूरने तर या सामन्यातील दोन्ही डावांत अर्धशतके झळकवली. बुमराहने ओली पोप (२), जोनी बेअरस्टो (०), जडेजाने हसीब हमीद (६३), मोईन अली (०), शार्दुल ठाकूरने जो रूट (३६), उमेश यादवने ख्रिस वोक्स (१८), क्रेग ओव्हरटॉन (१०), जेम्स अ‍ॅण्डरसन (२) यांना बाद केले. यादवने ६० धावा देऊन ३ गडी, ठाकूरने २२ धावा देऊन २, बुमराहने २७ धावांमध्ये २ आणि जडेजाने ५० धावांमध्ये २ गडी टिपले. अंतिम धावफलक भारत १९१ व ४६६, इंग्लंड २९० व २१०. शेवटची व अंतिम कसोटी १० सप्टेंबरपासून मॅन्चेस्टर येथे होणार आहे.

 

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.