Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
तुम्ही घेत असलेली कोरोना लस खरी की बनावट, कसे ओळखाल; जाणून घ्या
07-Sep-2021, 2:22:16 pm
Edited by - Smruti Chobitkar
सद्यस्थितीत भारतात (India) कोविशील्ड (Covishield), कोवॅक्सीन (Covaxin) आणि स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) या लसी (vaccine) दिल्या जात असून तुम्हाला दिली जाणारी लस खरी आहे की बनावट हे ओळखण्यासाठी (corona vaccine is real or fake) मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. (covaxin covishield sputnik v how to identify if your corona vaccine is real or fake)
Abhijeet Bharat

नागपूर : देशातील कोरोना महामारीवर अटकाव घालण्यासाठी आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. परंतु, यादरम्यान महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील काही ठिकाणी बनावट कोरोना लसीची प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी सरकार प्रशासनाबरोबरच सामान्य लोकांनाही जागरूक करत आहे.

सद्यस्थितीत भारतात कोविशील्ड, कोवॅक्सीन आणि स्पुतनिक-व्ही या लसी दिल्या जात असून तुम्हाला दिली जाणारी लस खरी आहे की बनावट हे ओळखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सामान्य लोकांना कोरोना लस खरी आहे की बनावट हे लवकर ओळखता येणार नाही. परंतु, लस पुरवण्याचे काम पाहणाऱ्या प्रशासनाच्या लोकांना नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांमुळे नक्कीच मदत होणार आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांच्या वतीने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचे सर्व अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव (आरोग्य) यांना एक पत्र लिहिले गेले आहे. कोरोना लस वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक प्रमाणित करणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले गेले आहे. यासोबतच, खरी कोरोना लस ओळखण्यासही सांगण्यात आले आहे.

कोविशील्ड लसीला कसे ओळखावे
१. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे लेबल, एसआयआय लेबल गडद हिरव्या रंगाचे असेल
२. गडद हिरव्या रंगाची ॲल्युमिनियम फ्लिप-ऑफ सील असेल.
३. ब्रँडचे नाव COVISHIELD ट्रेड मार्कसह लिहिले असेल.
४. जेनेरिक नावाचा टेक्स्ट फॉन्ट ठळक अक्षरांमध्ये नसेल.
५. CGS NOT FOR SALE प्रिंट असेल.

कोवॅक्सीनची ओळख
१. लेबलमध्ये न दिसणारे (अदृश्य) यूव्ही होलिक्स असतील, जे केवळ यूव्ही लाईट्समध्येच दिसतील.
२. COVAXIN चे 'X' दोन रंगात असेल. याला ग्रीन फॉइल इफेक्ट म्हणतात.

स्पुतनिक-व्ही लसीला कसे ओळखावे
१. स्पुतनिक-व्ही लसीची रशियातील दोन वेगवेगळ्या प्लांटमधून आयात केली जात आहे. त्यामुळे याचे वेगवेगळी लेबल मिळतील.
२. लेबलवर दिलेली माहिती आणि डिझाइन समान असेल. फक्त प्लांटचे नाव वेगळे असेल.
३. आतापर्यंत आयात केलेली स्पुतनिक-व्ही ५ कुपी असलेल्या कार्डबोर्ड पॅकमध्ये येते. याच्या पॅकेटवर इंग्रजीत नाव लिहिले असते.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

  

  

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.