Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
देशाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन घडविणारी अशी आहे रामायण सर्किट ट्रेन
06-Sep-2021, 7:35:59 pm
Edited by - Pravin wankhede
भारत भ्रमणासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आयोद्धेपासून रामेश्वरपर्यंत धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. IRCTC ने येत्या ७ नोव्हेंबरपासून रामायण सर्किट ट्रेन (Ramayana Circuit Train) सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
Abhijeet Bharat

नवी दिल्ली:  भारत भ्रमणासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आयोद्धेपासून रामेश्वरपर्यंत धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. IRCTC ने येत्या ७ नोव्हेंबरपासून रामायण सर्किट ट्रेन सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. या ट्रेनद्वारे भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देणं यात्रेकरूंना सोयिस्कर होणार आहे. ही ट्रेन १७ दिवसात ७५०० किमी प्रवास करणार आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, रामायण सर्किट ट्रेन दिल्लीच्या सफदरगंज रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही रामायण सर्किट ट्रेन सर्वप्रथम अयोध्येला जाणार आहे. ज्याठिकाणी श्री राम जन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिर आणि भरत मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर ही ट्रेन सीतामढीला रवाना होईल जिथे जानकीचे जन्मस्थान आणि राम मंदिराला भेट देण्यात येणार आहे. येथून पुढील प्रवास हा काशी, चित्रकूट आणि नाशिक असा असणार आहे. नाशिकनंतर ट्रेन हंपीला दाखल होईल. या प्रवासाचे शेवटचे स्थानक रामेश्वरम असणार असून येथून ट्रेन नंतर दिल्लीला परत रवाना होणार आहे.

याट्रेनने प्रवास करण्यासाठी एसी फर्स्ट क्लाससाठीचे या प्रवासाचे भाडे १, ०२, ०९५ रुपये आणि सेकंड क्लाससाठी ८२,९५० रुपये असं भाडं आहे. या ट्रेनने प्रवास करायचा असेल तर यात्रेकरूना IRCTC च्या वेबसाईटद्वारे तिकीट बुकिंग करता येणार आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोकच हा प्रवास करू शकणार आहेत. रामायण सर्किट ट्रेनमधील प्रवाशांना खाण्या-पिण्याची आणि राहण्याची सोय असेल तसेच, धार्मिक स्थळावर जाताना लक्झरी बसने नेले जाणार आहे. यासह एसी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार असून यामध्ये लायब्ररी, किचन, शॉवर आणि टॉयलेटची सुविधा देखील असणार आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.